उत्पादन शुल्क विभागाची अवैध दारु विकणाऱ्यांवर कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

नांदेड - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष भरारी पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. या पथकांनी ११ जणांना अटक करून त्यांच्याकडून दोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला. 

नांदेड - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष भरारी पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. या पथकांनी ११ जणांना अटक करून त्यांच्याकडून दोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक निलेश सांगडे यांच्या आदेशावरून जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात अवैध देशी दारु, हातभट्टी, ताडी या धंद्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथकांची नेमणुक केली. या पथकाचे निरिक्षक एस. एस. खंडेराय आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्ह्यात बुधवारी (ता. २३) छापे टाकले. यावेळी ११ आरोपींना अटक केली. तसेच पाच बेवारस गुन्हे दाखल केले. अटक केलेल्या आरोपींकडून ६० लीटर देशी दारु, ६० लीटर हातभट्टी दारू, ताडी १५० लीटर, रसायन ६०० लीटर आणि तीन दुचाकी असा एक लाख ८२ हजार २९० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. या विशेष पथकांच्या कारवाईमुळे अवैध धंदे वाल्यांचे धाबे दणाणले आहे. अशा पध्दतीचे छापा सत्र सुरूच राहणार असल्याचे अधिक्षक निलेश सांगडे यांनी सांगितले.

Web Title: Action for illegal vendors of the Department of Excise Department