पाणीटंचाई निवारणासाठी एक कोटीचा कृती आराखडा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

जळकोट - तालुक्‍यात वर्षभरात पाणीटंचाई निवारणार्थ पंचायत समितीने एक कोटी दोन लाख ७५ हजार ६०० रुपयांचा कृती आराखडा केला असून तीन टप्प्यांत विविध उपाययोजनांची तरतूद त्यात केल्याची माहिती गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. तालुक्‍यात यावर्षी समाधानकारक पाऊस पडला असला, तरी आगामी काळात पाणीटंचाई निर्माण झाल्यास त्यावर उपाययोजना करण्यासाठी हा कृती आराखडा तयार केल्याची माहिती पाणीटंचाई निवारण कक्षप्रमुख एच. जी. गिरी यांनी दिली.

पहिल्या टप्प्यात एक ऑक्‍टोबर ते ३१ डिसेंबरदरम्यान टंचाई नसल्याने कोणतीही उपाययोजना करावी लागली नसल्याने निरंकच राहिले. तर दुसरा टप्पा एक जानेवारी ते ३१ मार्च २०१७ दरम्यानचा असून, या काळात उपाययोजनेसाठी २३ लाख रुपयांची तरतूद केली आहे. यात नळयोजना विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या पूरक नळयोजना दुरुस्ती आदींचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यात एक एप्रिल ते ३० जून २०१७ दरम्यान विविध उपाययोजनांसाठी ७९ लाख ७५ हजार ६०० रुपये खर्चाची तरतूद केली आहे.

यात अंदाजित खर्च टॅंकर (४३ लाख २० हजार), खासगी विहिरी, विंधन विहीर, अधिग्रहण करणे (१९ लाख ६५ हजार ६०० रुपये), विंधनविहिरी घेणे (१२ लाख ६५ हजार), विंधनविहिरींची विशेष दुरुस्ती (४२ लाख ५ हजार रुपये). यात एकूण १८ अपेक्षित टॅंकर संख्या, ५४ अधिग्रहण, १३ विंधनविहिरी, १२ विशेष दुरुस्ती आदींचा समावेश आहे. 

आगामी काळात टंचाई निवारणासाठी तालुक्‍यातील पाटोदा बुद्रूक, करंजी, विराळ, कुणकी, जगळपूर, उमरगा रेतू, यलदरा, हावरगा, डोमगाव, जिरगा, चेरा, शेलदरा, सोरगा, वडगाव, धामणगाव, ढोरसांगवी, वांजरवाडा, केकतसिंदगी, चाटेवाडी, उमरदरा, होकर्णा, घोणसी, खंबळवाडी, धोडवाडी, गुत्ती, कोळनूर, लाळी बु, लाळी खुर्द, पाटोदा खुर्द, बेळसांगवी, मंगरूळ, कोनाळी डोंगर, येवरी आदी गावांचा यात समावेश असल्याचे कक्षप्रमुख एच. जी. गिरी, श्रीकांत चव्हाण, श्री. तोडकरी यांनी सांगितले.

Web Title: Action Plan for resolving the water shortage million