रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांवर, प्लॅस्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई 

माधव इतबारे
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

औरंगाबाद : रस्त्यावर कचरा टाकणे, प्लॅस्टिक बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात महापालिकेने "नागरिक मित्र पथका'च्या माध्यमातून कारवाईचा बडगा उगारला आहे. तीन महिन्यात तब्बल 1630 नागरिक, प्रतिष्ठांनावर कारवाई करून सात लाख 34 हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. 

औरंगाबाद : रस्त्यावर कचरा टाकणे, प्लॅस्टिक बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात महापालिकेने "नागरिक मित्र पथका'च्या माध्यमातून कारवाईचा बडगा उगारला आहे. तीन महिन्यात तब्बल 1630 नागरिक, प्रतिष्ठांनावर कारवाई करून सात लाख 34 हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. 

कचराकोंडीनंतर महापालिकेने ओला व सुका असे कचऱ्याचे वर्गीकरण करणे बंधनकारक केले. मात्र अनेक नागरिक विशेषतः प्रभाग एक ते तीन व नऊमध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मिक्‍स कचरा फेकला जात होता. त्यामुळे या प्रभागातील नागरिकांची मानसिकता बदलण्यासाठी दिल्ली येथील तीन संस्थांची पाच महिन्यांसाठी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्यावर दीड कोटी रुपये खर्च करण्यात आला. या संस्थांनी घरोघरी जाऊन नागरिकांनी रस्त्यावर कचरा न फेकता ओला व सुका असे वर्गीकरण करून ओल्या कचऱ्यावर घरीच खत निर्मिती करण्यासाठी अनेकांना प्रशिक्षण दिले. त्यामुळे काही गल्ल्या कचरामुक्तही झाल्या.

मात्र अद्याप अनेक ठिकाणी रस्त्यावर कचरा फेकला जातो. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी महापालिकेने माजी सैनिकांचे नागरिक मित्र पथक स्थापन केले आहे. त्यासाठी 90 जणांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र 41 जणांची सुरक्षा विभागात नियुक्ती करण्यात आली तर उर्वरित माजी सैनिकांचे पथक गल्लोगल्ली फिरून रस्त्यावर कचरा फेकणे व प्लॅस्टिक बंदीचे उल्लंघन करणाऱ्याच्या विरोधात कारवाई करत आहे. गेल्या तीन महिन्यात म्हणजे 18 डिसेंबरपर्यंत 1653 नागरिकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. ही रक्कम सात लाख 34 हजारांच्या घरात गेली आहे. 

वसूल झालेला दंड 
महिना नागरिक रक्कम 
ऑक्‍टोंबर 780 2,82,950 
नोव्हेंबर 631 3,30,120 
डिसेंबर 242 1,21,150 

Web Title: action on plastic bag users

टॅग्स