नांदेडमध्ये राज्य उत्पादन विभागाची कारवाई: 94 जणांना अटक  

प्रल्हाद कांबळे  
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

येथील या विभागाचे जिल्हा अधिक्षक निलेश सांगडे यांनी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व विभागाचा वरिष्ठांच्या आदेशावरून जिल्हयातील अवैध दारू विक्री व साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहिमेअंतर्गत विविध विभागनिहाय पथकांची नेमणूक केली. 

नांदेड : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या विशेष मोहीमेत जिल्हाभरातून 94 आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून साडेतेरा लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई एक ते 31 जुलै दरम्यान केली.

येथील या विभागाचे जिल्हा अधिक्षक निलेश सांगडे यांनी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व विभागाचा वरिष्ठांच्या आदेशावरून जिल्हयातील अवैध दारू विक्री व साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहिमेअंतर्गत विविध विभागनिहाय पथकांची नेमणूक केली. या पथकानी देगलूर, धर्माबाद, कुंडलवाडी, किनवट, माहूर, हिमायनगर, नांदेड शहर, भोकर, उमरी, बिलोली, कंधार, लोहा आणि मुखेड भागात देशी दारु, हातभट्टी अशा ठिकाणी छापे टाकले. यावेळी पथकांनी 13 लाख 37 हजार 667 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. तसेच 94 आरोपींना अटक केली.134  गुन्हे दाखल करुन त्यात 94 वारस तर 40 बेवारस. 330 लीटर देशी दारू, 424 लीटर हातभट्टी, परराज्यातून आलेली 70 लीटर, ताडी 2425 लीटर, रसायन 2110 लीटर, 13 दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला. यात निरिक्षक एस.एस. खंडेराय, श्री. चिलवंतकर यांच्यासह आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या पथकाचे जिल्हा अधिक्षक निलेश सांगडे यांनी कौतूक करून या पुढेही अशाच कारवाया सुरू राहतील असे 'सकाळ'शी बोलतांना सांगितले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Action Taken By State Production Department in Nanded