'ऍक्‍युपंक्‍चर कौन्सिलच्या नियुक्‍त्या पारदर्शक करा'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

औरंगाबाद - "महाराष्ट्र ऍक्‍युपंक्‍चर सिस्टिम ऑफ थेरपी ऍक्‍ट 2015'अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या राज्याच्या कौन्सिलमध्ये पारदर्शक नियुक्‍त्यांची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात गेल्या आठवड्यात त्यांनी निवेदनही दिले आहे.

कौन्सिलचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य निवडीबद्दल श्री. मुंडे यांनी गंभीर आक्षेप नोंदविले आहेत. डॉ. बेरामजी यांनी कौन्सिलसाठी जागा व निधी दिला म्हणून आणि ऍक्‍युपंक्‍चर थेरपी तज्ज्ञ नसलेल्या डॉ. चंद्रशेखर परदेशी यांची नेमणूक केवळ राज्यातील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांचा नातेवाईक म्हणून निवड करण्यात आल्याचे ते म्हणाले. राज्य सरकारने औरंगाबाद खंडपीठात दिलेल्या शपथपत्रात निधी व जागेच्या बदल्यात कोणाचीही कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड न करता गुणवत्तेनुसार निवड होईल, असे सांगितले होते. त्यानुसार डॉ. बेरामजी यांची निवड शपथपत्राचे उल्लंघन असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Web Title: acupuncture council selection dhananjay munde