हिंगोलीतील दहा गावे नांदेडला जोडा

photo
photo

आखाडा बाळापूर (जि. हिंगोली): कळमनुरी तालुक्‍यातील डोंगरकडा, हिवरा, झुनझुनवाडी, भाटेगाव आदी गावांचा नांदेड जिल्‍ह्यात समावेश करावा, या मागणीसाठी डोंगरकडा फाटा येथे शनिवारी (ता.२५) सकाळी दहा वाजता रास्‍तारोको आंदोलन करण्यात आले.

कळमनुरी तालुक्‍यातील डोंगरकडा, हिवरा, भाटेगाव, झुनझूनवाडी, वरुड, जामगव्हाण, सुकळीवीर, जवळा पांचाळ, वडगाव या गावांना हिंगोलीचे अंतर साठ; तर कळमनुरी तालुक्‍याचे अंतर चाळीस किलोमीटर पडते. परंतु, डोंगरकडा फाटा येथून अर्धापूर तालुका बारा; तर नांदेडचे अंतर २७ किलोमीटर आहे. त्यामुळे अर्धापूरसह नांदेड हे जवळचे व सोयीचे ठिकाण आहे. तालुका, जिल्ह्याला विविध शासकीय व प्रशासकीय कामासाठी जावे लागते. त्यामुळे वेळ व पैशांचा अपव्यय होत आहे. तसेच गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. 
 


दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा

त्‍यामुळे डोंगरकडा परिसरातील गावांचा नांदेड जिल्‍ह्यात समावेश करावा, या मागणीसाठी शनिवारी हिंगोली-नांदेड महामार्गावर रास्तारोको करण्यात आला. यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यानंतर तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे, पोलिस निरीक्षक विकास थोरात यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


सीएए’,‘एनआरसी’ विरोधात रास्तारोको

औंढा नागनाथ : शहरात सीएए व एनआरसी व एनपीआरच्या विरोधात जुन्या बसस्थानकासमोर शनिवारी (ता.२५) एकतास रस्तारोको आंदोलन करण्यात आले. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. हा कायदा रद्द करावा, अशी मागणी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यात विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

 

पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा समावेश

 या वेळी नगरसेवक सुमेध मुळे, मौलाना अमीन राही, बाळासाहेब साळवे, राजकुमार जोंधळे, राम मुळे, अरविंद मुळे, महेंद्र जोंधळे, आजर इनामदार, आकाश सुतारे, रामराव मुळे, महेंद्र जोंधळे, सदानंद मुळे, डॉ. चंद्रमुनी पाईकराव, दिलीप खंदारे, महेंद्र मुळे, सदानंद मुळे, गजानन मुळे, देवानंद मुळे, कपिल साखरे, निवृत्ती नागरे, अक्षय वाहुळे, उत्तम साखरे, आशिष मुळे, सखाराम कांबळे, महेंद्र मुळे, आशरफ पठाण, शेख मजहर, अक्रम खान, अरविंद मुळे, सादत सय्यद, आकाश सुतारे, किरण पाईकराव, भीमा सुतारे आदींचा सहभाग होता. पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

कळमनुरीत आदोलन

कळमनुरी: नागरिकत्व कायदा केंद्र शासनाने रद्द करावा या मागणीसाठी शहरातील युवकांनी बसस्थानक परिसरात शनिवारी (ता.२५) तोंडाला काळ्‍या पट्ट्या बांधून आंदोलन केले. या आंदोलनात राजू कांबळे, अजीस खा पठाण, शेख एजाज, सय्यद विकी, माणिक पाईकराव, विशाल पाईकराव, शेख नदीम, अझहर खान, हाफिज बागवान, साबेर अतर, आमेर पठाण, शेख सादेक, खालेदभाई, अबुजर बागवान, अली बागवान, यासिन आदी तरुणांनी सहभाग घेतला.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com