चार लाखांची सुपारी देऊन व्यसनी मुलाचा खून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

लातूर - गेल्या आठ वर्षांपासून दारू पिऊन त्रास देणाऱ्या मुलाचा चार लाखांची सुपारी देऊन वडिलांनीच खून घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार येथे उघडकीस आला आहे. सात दिवसांपूर्वीच्या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात वडिलांसह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.

येथील बोधेनगर भागात राहणारा अमृत माणिक मुक्ता (वय 26) हा ता. 24 ऑक्‍टोबरपासून बेपत्ता झाला होता. ता. 26 आक्‍टोबर रोजी त्याचे वडील माणिक मुक्ता यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रारही दिली होती. दरम्यान अहमदपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत काजळ हिप्परगा शिवारात ता. 28 ऑक्‍टोबर रोजी अमृत मुक्ता याचा मृतदेह आढळून आला. कोणीतरी अपहरण करून खून केल्याची फिर्याद त्याच्या वडिलांनी दिल्यावरून ता. 31 ऑक्‍टोबर रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास केला. यात अमृत मुक्ता हा गायब झाल्यानंतर दोन दिवसांनी त्याच्या वडिलांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. ते ही तक्रार देण्यासाठी तयार नसताना अमृतच्या मामाने ही तक्रार द्यायला लावली होती. या प्रकरणात पोलिसांनी अमृतचे वडील माणिक मुक्ताचे व अमृत ज्या दिवशी गायब झाला त्या दिवशी सर्वांत शेवटी ज्याच्यासोबत होता त्या नामदेव अंगद थोरमोटे याच्या कॉल डिटेल्सची तपासणी केली. माणिक मुक्ता व थोरमोटे हे एकमेकांच्या संपर्कात असल्याची खात्री पटली. त्यानंतर या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Web Title: Addicted child murder