नवरात्रोत्सवात जादा बस सोडण्यात येणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 सप्टेंबर 2016

तुळजापूर - तुळजाभवानी मातेच्या नवरात्रोत्सवामुळे भाविकांच्या सोयीसाठी जादा बस सोडण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांनी गुरुवारी (ता.29) दिली. 

येथील सर्किट हाऊसमध्ये जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक श्री. देशमुख यांनी घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत श्री. देशमुख बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, ऍड. अनिल काळे, जिल्हा उपाध्यक्ष विजय शिंगाडे, विजयकुमार वाघमारे, प्रभाकर मुळे, दत्ता राजमाने, नागेश नाईक, भाजपा तालुकाध्यक्ष सत्यवान सुरवसे, गुलचंद व्यवहारे, सुहास साळुंके यांची उपस्थिती होती. 

श्री. देशमुख म्हणाले, की तुळजाभवानी मातेच्या नवरात्रोत्सवात भाविकांच्या विविध सोयी सुविधांबद्दल आरोग्य प्रशासनास सुविधा देण्यात आल्या आहेत. मंदिर व बसस्थानक परिसरासह शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी आरोग्य केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. राज्य परिवहन महामंडळाकडून राज्यभरातून सुमारे 775 पेक्षा जास्त बसची सोय केली जाणार आहे. सोलापूर आणि मराठवाड्यातून जास्तीच्या एसटीची सोय केली आहे, असे त्यांनी सांगितले. 

दिवसेंदिवस प्रशासन आणि व्यापारी यांच्यातील वाद वाढत आहे. याकडे लक्ष वेधले असता त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाद्वारातून रस्ता वळविण्याच्या प्रश्नाबाबत बैठक घेतली. बैठकीतून यात्रेबाबतचा मार्ग मोकळा झाला आहे. उपजिल्हा रुग्णालयात खाटांची सोय करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तत्पूर्वी श्री. देशमुख यांनी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्या वेळी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, अविनाश कोळे, शामल वडणे, शाम पवार, अतरिक्त जिल्हाधिकारी अविनाश पाठक, उपविभागीय अधिकारी नीलेश श्रींगी, तहसीलदार दिनेश झावले उपस्थित होते. या बैठकीस अधिकाऱ्यांपेक्षा कार्यकर्त्यांची गर्दी होती.

Web Title: additional bus will leave- deshmukh