पाणी चोरून वॉशिंगचा धंदा 

पाणी चोरून वॉशिंगचा धंदा 

औरंगाबाद - महापालिकेच्या मुख्य पाइपलाइनवरून नळ घेऊन काही ठिकाणी वॉशिंग सेंटर चालविले जात असल्याचा प्रकार बुधवारी (ता.२६) समोर आला. महापालिकेने मुख्य पाइपलाइनवर बेकायदा नळ तोडण्याची सहा ठिकाणी मोहीम राबविली असता, अनेक वॉशिंग सेंटरचालकांनी बेकायदा नळ घेतल्याचे समोर आले. त्यामुळे आता या वॉशिंग सेंटरचालकांविरोधात गुन्हे दाखल करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.  
शहरात गेल्या काही महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, उन्हाळ्यात नागरिकांना प्रचंड हाल सहन करावे लागले. नळाला आठ-आठ दिवसांनंतर पाणी येत असताना दुसरीकडे पाणीचोरांची मात्र चांदी होती.  शहरात लाखोंच्या संख्येने बेकायदा नळ असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे पावसाळा सुरू होताच महापालिका प्रशासनाने बेकायदा नळांच्या विरोधात बुधवारपासून मोहीम सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात व्यावसायिक बेकायदा नळांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. सहा पथकांनी सकाळी सहा वाजेपासून ही मोहीम सुरू केली. 

क्रांती चौक ते अमरप्रीत हॉटेल, किराणा चावडी, सेंट्रल नाका, मुकुंदवाडी ते चिकलठाणा, दीपाली हॉटेल ते मुकुंदवाडी, रेल्वेस्टेशन आदी भागांत ही मोहीम राबविण्यात आली. जेसीबीच्या साह्याने मुख्य जलवाहिनीजवळचा रस्ता खोदला असता एका-एका ठिकाणी पाच ते दहा कनेक्‍शन आढळून आले. ते तोडण्यात आले. मुकुंदवाडी ते चिकलठाणादरम्यान मुख्य पाइपलाइनमधून नळ घेऊन त्यावर वॉशिंग सेंटर चालविले जात असल्याचेही कारवाईत समोर आले. त्यांचे नळ तोडून पंचनामे करण्यात आले. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे उपायुक्‍त मंजूषा मुथा यांनी सांगितले. 

दोन एमएलडी पाणी वाढेल
बुधवारी दिवसभरात १५३ नळ तोडण्यात आले. त्यामुळे शहरात दीड ते दोन एमएलडी पाणी वाढेल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. हे पाणी व्यावसायिक २४ तास अनधिकृतपणे वापरत होते. ते आता नागरिकांना मिळेल. 

शहरात गेल्या काही महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, उन्हाळ्यात नागरिकांना प्रचंड हाल सहन करावे लागले. नळाला आठ-आठ दिवसांनंतर पाणी येत असताना दुसरीकडे पाणीचोरांची मात्र चांदी होती.  शहरात लाखोंच्या संख्येने बेकायदा नळ असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे पावसाळा सुरू होताच महापालिका प्रशासनाने बेकायदा नळांच्या विरोधात बुधवारपासून मोहीम सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात व्यावसायिक बेकायदा नळांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. सहा पथकांनी सकाळी सहा वाजेपासून ही मोहीम सुरू केली. 

क्रांती चौक ते अमरप्रीत हॉटेल, किराणा चावडी, सेंट्रल नाका, मुकुंदवाडी ते चिकलठाणा, दीपाली हॉटेल ते मुकुंदवाडी, रेल्वेस्टेशन आदी भागांत ही मोहीम राबविण्यात आली. जेसीबीच्या साह्याने मुख्य जलवाहिनीजवळचा रस्ता खोदला असता एका-एका ठिकाणी पाच ते दहा कनेक्‍शन आढळून आले. ते तोडण्यात आले. मुकुंदवाडी ते चिकलठाणादरम्यान मुख्य पाइपलाइनमधून नळ घेऊन त्यावर वॉशिंग सेंटर चालविले जात असल्याचेही कारवाईत समोर आले. त्यांचे नळ तोडून पंचनामे करण्यात आले. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे उपायुक्‍त मंजूषा मुथा यांनी सांगितले. 

आयुक्‍तांच्या आदेशावरून मुख्य जलवाहिन्यांवरील नळ तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम सुरूच राहणार आहे. वॉशिंग सेंटरसाठी ज्यांनी कनेक्‍शन घेतले होते, त्यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल केले जाणार आहेत. 
- मंजूषा मुथा, उपायुक्‍त.

एमआयएमने रोखली कारवाई 
सेंट्रल नाका भागात एमआयएमच्या नगरसेवकांनी कारवाईला विरोध केला. डॉ. गफार कादरी, विरोधी पक्षनेता सरिता बोर्डे यांचे पती अरुण बोर्डे, गटनेते नासेर सिद्दिकी यांच्यासह काही नगरसेवकांनी, नातेवाइकांनी कारवाईत भेदभाव होत असल्याचा आरोप केला. उपायुक्‍त मंजूषा मुथा यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र कोणीच ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यांनी ही कारवाई महापौरांच्या वॉर्डापासून सुरू करा, अशी मागणी केली. शेवटी सेव्हन हिल भागाकडून कारवाई करण्याचा निर्णय झाल्यानंतर एमआयएमचा विरोध मावळला. साडेचार तासानंतर हा गोंधळ संपला. दरम्यान पथक सेव्हनहिल येथे आले. या पथकाने एका महिलेला मात्र दहा मिनिटांचा देखील वेळ दिला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com