"ऍडव्हान्टेज महाराष्ट्र एक्‍स्पो'ला आज प्रारंभ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

औरंगाबाद - मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर (मसिआ) आणि सहसंयोजक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यातर्फे पाच ते आठ जानेवारीदरम्यान आयोजित "ऍडव्हान्टेज महाराष्ट्र एक्‍स्पो' प्रदर्शनाला गुरुवारपासून (ता. पाच) प्रारंभ होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता, चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील कलाग्राममध्ये उद्‌घाटन होईल. 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे उपस्थित राहणार आहेत, तर पालकमंत्री रामदास कदम, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यासह महापौर भगवान घडामोडे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, खासदार रावसाहेब दानवे, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार सुभाष झांबड, सतीश चव्हाण, अतुल सावे, संजय शिरसाट, इम्तियाज जलील, प्रशांत बंब यांची प्रमुख उपस्थिती असेल. 

प्रदर्शनामध्ये सकाळी साडेदहा ते दुपारी दोन वाजेपर्यंतचा वेळ हा व्यावसायिक भेटी आणि वाटाघाटींकरिता राखीव असून, दुपारी दोन ते सायंकाळी सात हा वेळ सर्वसामान्यांकरिता खुला आहे. प्रवेशाकरिता नाममात्र प्रवेश शुल्क असेल. प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन मसिआचे अध्यक्ष विजय लेकुरवाळे, उपाध्यक्ष किशोर राठी, प्रदर्शन समन्वयक संतोष कुलकर्णी, भारत मोतिंगे, प्रसिद्धिप्रमुख अर्जुन गायके, राहुल मोगले, माजी अध्यक्ष संतोष चौधरी, भगवान राऊत, बालाजी शिंदे, सुनील भोसले, सुनील किर्दक, अभय हंचनाळ, नारायण पवार, अब्दुल शेख, मनीष बाफना, कुंदन रेड्डी, फुलचंद जैन, गजानन देशमुख, मनीष अग्रवाल, उदय गिरधारी, प्रसाद मुळे, अनुप काबरा, ज्ञानदेव राजळे, अनिल पाटील, संदीप जोशी, सचिन गायके यांनी केले. 

Web Title: Advantage Maharashtra Expo starts today