लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने तरुणाने स्विकारला चोरीचा मार्ग!

उमरगा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील जकेकुर - चौरस्ता येथून ऑगस्ट महिन्यात चोरीला गेलेल्या दुचाकीचा तपास लागला आहे.
Vehicle Theft
Vehicle TheftSakal

उमरगा - तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील जकेकुर - चौरस्ता येथून ऑगस्ट महिन्यात चोरीला (Theft) गेलेल्या दुचाकीचा तपास (Inquiry) लागला आहे. पोलिसांनी (Police) दुचाकी चोरास अटक केली असून त्याच्याकडे दुचाकी मिळून आली आहे. दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे कामावरून कमी केल्याने उदरनिर्वाहासाठी चोरीचा मार्ग स्वीकारल्याची माहिती पोलिसांना सांगितली.

या बाबतची माहिती अशी की, उमरगा शहर व परिसरात गेल्या काही महिन्यात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. ३१ ऑगस्ट २०२१ रोजी जकेकुर- चौरस्ता येथून रस्त्यावर थांबवलेली एच एफ डीलक्स कंपनीची दुचाकी (एम एच 25,ए इ 7650) चोरीला गेली होती. याबाबत उमरगा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता. दुचाकी चोरीचा प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश क्षीरसागर व त्यांचे पथक करीत होते.

Vehicle Theft
तुळजापूर : पाच वर्षीय मुलाचा अल्पवयीन मुलाकडूनच खून

चोरीच्या दुचाकीची माहिती मिळाल्यानुसार कर्नाटक राज्यातील होदलूर (ता.आळंद जि. कलबुर्गी) येथून त्याच्या राहत्या घरून काशिनाथ सूत्रे, याला अटक करण्यात आली. यावेळी त्याच्याकडून चोरलेली दुचाकी ही ताब्यात घेण्यात आली. बंगलोर येथे एक हॉटेलात आचारी म्हणून काम करीत होतो पण लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद पडले व गावी यावे लागले. हाताला काम नसल्याने दोन दुचाकी चोरल्या होत्या त्यापैकी एक ज्याची चोरली होती त्यास परत केली होती तर दुसरी दुचाकी विकण्याचा प्रयत्न करीत होता पण त्याअगोदरच पोलिसांच्या जाळ्यात अडकलो असे त्यांनी सांगितले. उपविभागिय पोलीस अधिकारी रमेश बरकते, पोलीस निरीक्षक इकबाल सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश क्षिरसागर, हवालदार संजीवन शिंदे, पोलिस नाईक श्री. जाधव, पोलिस कर्मचारी कांबळे, श्री. सय्यद यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com