लग्नानंतर नवरी फरार

मुख्य सूत्रधार आरोपी गजाआड
रामकिसन तापडीया
रामकिसन तापडीयाSakal

गेवराई - तालुक्यातील तळणेवाडी येथील एका तरुणाला बनावट लग्न करून दोन लाख रुपयांचा गंडा घातला असल्याची तक्रार गेवराई पोलिसांत दाखल होती. या प्रकरणाशी निगडीत असणाऱ्या मुख्य सूत्रधाराला शेवगाव (जि. अहमदनगर) येथून गेवराई पोलिसांनी अटक केली आहे. तळणेवाडी येथील कृष्णा अशोक फरताळे या मुलाला आरोपी रामकिसन जगन्नाथ तापडीया (रा.सालवडगाव, ता.शेवगाव, जि.अहमदनगर) या व्यक्तीने औरंगाबाद येथील एका मुलीचे स्थळ आणले. दरम्यान नवरी मुलगी रेखा चौधरी व इतर चार जणांनी दोन लाख देत असाल तर लग्नास सहमती दर्शविली. त्यानुसार नवरीकडील मंडळींना रोख ६० हजार व १ लाख ४० हजाराचा धनादेश दिल्यानंतर गेवराई तालुक्यातील बोरीपिंपळगाव फाट्यावरील एका मंगल कार्यालयात ता.२० जुलै २०२१ रोजी लग्न समारंभ पार पडला.

दरम्यान दिलेला धनादेश आठ दिवसांत वटताच नवरी मुलगी रेखा ही माहेरी जाते म्हणून गेली. यानंतर वेळोवेळी वेगवेगळे कारणे देत ती परत आलीच नाही. यानंतर काही दिवसांनी तिचा मोबाईल बंद झाला. दरम्यान तिचा आठ वर्षांपूर्वी काकासाहेब भाऊसाहेब पठाडे या व्यक्तीशी विवाह झाला असून त्यांना दोन अपत्य देखील असल्याचे नवरदेवाकडील मंडळींना कळाले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नवरदेव मुलगा कृष्णा फरताळे याच्या फिर्यादीवरून संतोष विश्वनाथ शिंदे, सुनिता बाळू चौधरी, रेखा बाळू चौधरी (तिघे रा.जाधववाडी, औरंगाबाद सिडको), रामकिसन जगन्नाथ तापडीया (रा.सालवडगाव, ता.शेवगाव जि.अहमदनगर) व विठ्ठल किसन पवार (रा.सावरखेडा, औरंगाबाद, गंगापूर) या पाच जणांविरुद्ध गेवराई पोलिस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणातील मुख्य सूत्रधार रामकिसन जगन्नाथ तापडीया याला गेवराई पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. त्याला बुधवारी सकाळी न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com