बॅंकांच्या विलीनीकरणानंतर ग्राहक, व्यवहारात होणार बदल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

बॅंक ऑफ बडोदा, विजया आणि देना बॅंक यांचे विलीनीकरण होणार असल्याचा निर्णय डिसेंबर महिन्यात घेण्यात आला होता. या निर्णयावर अखेर 2 जानेवारीला केंद्रीय मंत्रिमंडळाने यासाठी मंजुरी दिली.

औरंगाबाद : स्टेट बॅंक ऑफ हैदराबादचे स्टेट बॅंक ऑफ इंडियात विलीनकरण झाल्यानंतर आता देना व विजया बॅंकेचे बॅंक ऑफ बडोदा बॅंकेत विलीनकरणाला नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यामुळे विलीनीकरणानंतर सदरील बॅंकेच्या ग्राहक, व्यवहारात व सेवेत मोठे बदल होणार आहेत. या दोन्ही बॅंकेच्या हजारो ग्राहकांना येत्या काही काळात नवीन सुविधा मिळणार आहेत. 

बॅंक ऑफ बडोदा, विजया आणि देना बॅंक यांचे विलीनीकरण होणार असल्याचा निर्णय डिसेंबर महिन्यात घेण्यात आला होता. या निर्णयावर अखेर 2 जानेवारीला केंद्रीय मंत्रिमंडळाने यासाठी मंजुरी दिली. त्यामुळे बॅंकांच्या विलीनीकरणामुळे तिन्ही बॅंकेच्या ताळेबंदावर आणि ग्राहकांवर याचा परिणाम होईल. तसेच सदरील बॅंकेच्या ग्राहकांना नवीन बदल करून घ्यावे लागणार आहेत. विलीनीकरणास मंजुरी मिळालेली असली तरी विलीनिकरणाला आणखी काही वेळ लागेल. बॅंकेची शाखा, आयएफसीकोड, पासबुक, चेकबुक, एटीएममध्ये बदल होतील. ग्राहकांचे खाते क्रमांक सध्या तरी बदलणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. विलीनकरणामुळे ग्राहकांना आपला आधारलिंक असलेला मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, आणि पत्ता बॅंकेकडे अपडेट करावे लागतील.

विशेष म्हणजे विलीनीकरणामुळे बॅंकेच्या काही शाखा बंद होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. त्यामुळे ग्राहकांना नवीन शाखा चाल झालेल्या ठिकाणी जाऊन बॅंकेचे व्यवहार करावे लागणार आहे. विलीनीकरणाचा निर्णय झाला आहे. परंतू, बॅंकेच्या वरील कार्यालयातून किंवा रिझर्व्ह बॅंकेकडून कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत.

Web Title: After the merger of banks the changes will be made in the transaction and customers