पत्नीचा गळा आवळून खून केल्यावर पती झाला पोलीस ठाण्यात हजर

योगेश पायघन
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

औरंगाबाद ः पडेगाव, कासंबरी दर्गा परिसरात पतीच्या चारित्र्यावर संशय घेऊन भांडण करणाऱ्या पत्नीचा पतीने गळा आवळून खून केल्याची घटना शनिवारी (ता. 17) दुपारी दीडच्या सुमारास समोर आली. नाजनीन उस्मान शेख (वय 35) असे या मृताचे नाव आहे. खून केल्यानंतर रिक्षाचालक असलेल्या पती उस्मान इस्माईल शेख (वय 40, रा. पडेगाव) याने छावणी पोलिस ठाणे गाठत गुन्ह्याची कबुली दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उस्मान हा पत्नी नाजनीन, तीन मुले आणि दोन मुलींसह कासंबरी दर्गाच्या पाठीमागे असलेल्या भागात राहतो. उस्मानचे टाऊन हॉल परिसरातही वडिलोपार्जित घर असून, त्या ठिकाणी आई आणि भाऊ राहतात. पडेगावातील घर डोंगराच्या पायथ्याशी असल्याने तिथे नेहमीच साप निघतात. त्यामुळे या भागात राहण्यास नाजनीन इच्छुक नव्हती. त्यामुळे टाऊन हॉल भागातील घरी राहण्याचा आग्रह तिने पती उस्मान याच्याकडे लावला. त्यातून पती, सासू, दीर यांच्यासोबत वादही झाले. नाजनीनने हा मुद्दा लोकप्रतिनिधीच्या समोर मांडून टाऊन हॉल भागातील एक खोली मिळवून घेतली होती. गेल्या आठवडाभरापासून तिथे सर्व कुटुंब राहत होते; परंतु आठ दिवसांतही अनेक वाद, हाणामारी झाली. हा वाद नको म्हणून शुक्रवारी (ता.16) सायंकाळी दोघेही दुचाकीवर बसून पडेगाव भागातील घरी गेले. पाचही मुलांना टाऊन हॉलच्या घरीच ठेवले. शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास पतीसोबत कडाक्‍याचे भांडण सुरू झाले. पत्नीने पतीला मारहाण करण्यास सुरवात करताच पती उस्मानचा पारा वाढला. त्याने नाजनीनला मारहाण करीत खाली पाडले आणि बाजूला पडलेल्या नायलॉनच्या दोरीने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर घराचा दरवाजा बाहेरून लावून घेत कुलूप लावले. त्यानंतर सरळ छावणी पोलिस ठाण्यात जाऊन त्याने खुनाची कबुली दिली. 

खून केला; चावी घ्या! 
उस्मानने पोलिस निरीक्षक मनोज पगारे यांच्यासमोर येऊन पत्नीचा खून केल्याचे सांगितले. तसेच घराला कुलूप लावले असून ही घ्या चावी, असे म्हटले. त्यावर पोलिस निरीक्षक पगारे, उपनिरीक्षक गणेश सुरवसे यांनी उस्मानला वाहनामध्ये बसवून तत्काळ घटनास्थळ गाठले. टाऊन हॉल भागातच राहणाऱ्या नाजनीनच्या आई-वडिलांना तिच्या खुनाची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोचले आणि त्यांनी आक्रोश सुरू केला. पोलिसांनी नाजनीनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटीत पाठविला. मालमत्तेच्या वादातून सासरच्या मंडळींनी मुलीचा जीव घेतल्याचा आरोप त्यांनी केला. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After murdering his wife by throat Husband attends police station