esakal | प्रतिक्षा संपली! अंबडच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची किलबिलाट | Schools Open In Jalna
sakal

बोलून बातमी शोधा

अंबड (जि.जालना)  : शहरातील मत्स्योदरी विद्यालयात विद्यार्थी आनंदाने हजेरी लावली.

प्रतिक्षा संपली! अंबडच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची किलबिलाट

sakal_logo
By
बाबासाहेब गोंटे

अंबड (जि.जालना) : अखेर सलग दीड वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर शासनाने घेतलेल्या निर्णयाची शिक्षण विभागाने अंमलबजावणी करत सोमवारी (ता.चार) अखेर शाळेची घंटा वाजली आहे. सकाळपासूनच अंबड (Ambad) शहरातील मत्स्योदरी विद्यालय, ओमशांती, समर्थ, कै दत्ताजी भाले, जैन इंग्लिश स्कुल, आर.पी.इंग्लिश स्कुल, सावित्रीबाई फुले, जिल्हा परिषद, डॉ.आंबेडकर विद्यालयसह आदी शाळेच्या मैदानात विद्यार्थी-पालक यांनी परिसर गजबजला होता. शासनाने काही प्रमाणात निर्बंध खुले (Schools open) करत शाळा, मंदिरे उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. यामुळे स्वच्छता व सुरक्षितता अंगी बाळगत योग्य ती खबरदारी घेण्याच्या सुचना शासन, प्रशासन यांच्या वतीने देण्यात आल्या आहे. त्याची योग्य ती (Jalna) अंमलबजावणी शाळेच्या प्रशासनाने घेत मुख्य प्रवेशद्वारावर सॅनिटायझर, मास्क, तापमापी यांचा वापर करण्यात आला आहे.

हेही वाचा: सिल्लोड-कन्नड मार्गावर रास्ता रोको आंदोलन, ग्रामस्थ आक्रमक

शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा लागली होती.शाळेच्या वर्गखोलीत बसुन ज्ञान घेणे,मैदानावर खेळणे, मैत्रिणी सोबत भोजन, खेळणे,चर्चा करणे याचा आनंद शाळा सुरू झाल्याने मनस्वी आहे.

- ज्ञानेश्वरी हडबे, विद्यार्थीनी

शाळा सुरू होण्याच्या दोन दिवस अगोदर वर्गखोल्याची साफसफाई, स्वच्छता, सॅनिटायझरची फवारणी करून स्टूलडेस्कमध्ये सुरक्षित अंतर ठेवून बैठक व्यवस्था करून सोमवारी इयत्ता आठवी ते दहावीच्या नियमित तासिका व इयत्ता पाचवी ते सातवीच्या ऑनलाईन तासिका सुरू करण्यात आल्या आहे.

- अरविंद देव, मुख्याध्यापक मत्स्योदरी विद्यालय

कोरोना महामारीच्या वाढत्या संकटामुळे विद्यार्थी घरातच बसून होते. आता प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी पुन्हा एकदा शिक्षणाच्या प्रवाहात येतील.

- कल्याण औटी, मुख्याध्यापक ओमशांती विद्यालय

कोरोना काळात शाळा बंद असल्याने ऑनलाईन शिक्षण सुरूच होते. मात्र प्रत्यक्ष वर्गात समोरासमोर शिकविण्याचा आनंद, उत्साह वेगळाच आहे. शिकविण्यात आगळा-वेगळा आनंद आहे. विद्यार्थी यांच्या समोरासमोर समस्या जाणुन चर्चा करून सोडविल्या जातात. अध्यापन चांगले करता येते. विद्यार्थी-शिक्षक यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदवत आहे.

- उमेश साळुंके, विज्ञान शिक्षक

loading image
go to top