तणावानंतर चाकूरची नगरपंचायत भाजपच्या ताब्यात

प्रशांत शेटे
सोमवार, 28 मे 2018

चाकूर : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या ताब्यात असलेल्या नगरपंचायतीतील नगरसेवकांना फोडून भाजपने नगराध्यक्षासह उपनगराध्यक्षपद पदरात पाडून घेतले. या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता.२८) शहरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. नगरपंचायत कार्यालयात पिठासीन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रविण फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची बैठक झाली. यात नगराध्यक्षपदी भाजपच्या रूपाली सिध्देश्वर पवार व उपनगराध्यक्षपदी नितीन गुणाजी रेड्डी यांची निवड झाली.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस नगराध्यक्षपदासाठी आघाडीकडून अनिता प्रकाश पटणे व उपनगराध्यक्षपदासाठी नसिमा मोहीब पठाण यांनी अर्ज दाखल केले होते. नगरपंचायतीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेसचे आठ, भाजपचे चार, विनायकराव पाटील मित्रमंडळाचे तीन व शिवसेनेचे दोन नगरसेवक आहेत. यातील काँग्रेसच्या मिना मोठेराव व शिवसेनेच्या मिरा फुलारी, लक्ष्मी काटे यांनी भाजपच्या बाजूने मतदान केले. यामुळे पवार व रेड्डी यांना नऊ तर पटणे व पठाण यांना आठ मते पडली. काँग्रेस आघाडीने नऊ नगरसेवकांना व्हीप जारी केला होता तरीही काँग्रेस नगरसेवक भाजपच्या सोबत गेले. नगरसेवक सभागृहात येत असताना तणावाची परस्थिती निर्माण झाली होती, उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक, पोलिस निरीक्षक रामेश्वर तट यांच्यासह ७० पोलिस व दंगा नियंत्रण पथकाने परिस्थिती नियंत्रणात आणली.

Web Title: After the tension, the chakrapur nagar panchayat is under the control of BJP