ऋणवसुली न्यायाधिकरणासमोर वकिलांचे उपोषण 

अनिलकुमार जमधडे 
शुक्रवार, 22 जून 2018

औरंगाबाद : औरंगाबाद ऋण वसुली न्यायाधिकरणात मागील दोन वर्षांपासून पीठासीन अधिकारी, वसुली अधिकारी व निबंधक नसल्याने वकील संघातर्फे शुक्रवारी (ता. 22) एकदिवसीय उपोषण करण्यात आले. 

औरंगाबाद : औरंगाबाद ऋण वसुली न्यायाधिकरणात मागील दोन वर्षांपासून पीठासीन अधिकारी, वसुली अधिकारी व निबंधक नसल्याने वकील संघातर्फे शुक्रवारी (ता. 22) एकदिवसीय उपोषण करण्यात आले. 

सिडको ऋण वसुली न्यायाधिकरणात बॅंकांचे दहा लाखांपेक्षा अधिकचे दावे चालवले जातात. मात्र पीठासन अधिकारी तसेच विविध रिक्त पदांमुळे कामकाज ठप्प झाले आहे. यामुळे चार हजार प्रकरणे प्रलंबीत असून, सहा हजार 595 कोटी रुपयांची वसुली ठप्प झाला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांचे रिक्त पदे भरण्यात यावेत या मागणीसाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यामध्ये डीआटी बार असोसिएशन ऑफ ऍडव्होकेटचे ऍड. अतुल मिश्रा, गोपाल कुलकर्णी, ऍड. अण्णासाहेब मुळे (शेकटेकर), ऍड. एस. व्ही. देशमुख, ऍड. सत्यजित वकील, ऍड. डी. एस. खंबाट यांच्या सह कील मंडळी सहभागी झाले आहेत. 

Web Title: agitation of advocates in front of loan recovery department in aurangabad