केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या प्रतिमेला मारले जोडे

कैलास चव्हाण
सोमवार, 4 जून 2018

देशभरात सध्या शेतकरी आंदोलन सुरु आहे. त्यावर दोन दिवसापूर्वी देशाचे कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी वादग्रस्त भाष्य केले आहे. त्याचा निषेध म्हणून परभणीत आंदोलन करण्यात आले.

परभणी - केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी शेतकरी आंदोलनावर केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून परभणीत सोमवारी (ता. 4) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आले.

देशभरात सध्या शेतकरी आंदोलन सुरु आहे. त्यावर दोन दिवसापूर्वी देशाचे कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी वादग्रस्त भाष्य केले आहे. त्याचा निषेध म्हणून परभणीत आंदोलन करण्यात आले. हालाकीचे जिवन जगणारा शेतकरी वर्ग जर संघटीत होऊन न्याय मागत असताना देशाचे कृषिमंत्र्यांनी अशा पध्दतीने बेताल वक्तव्य करुन शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळले आहे अशी टिका स्वाभिमानीने केली आहे. परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राधामोहनसिंह यांच्या प्रतिमेला जोडे मारुन प्रतिमा पायदळी तुडवण्यात आली. आंदोलनास जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, राम आवरगंड, केशव आरमळ आदी उपस्थित होते. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Agitation against central agriculture minister at parbhani