रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांविरोधात परळीत रहिवाशांचा ठिय्या 

bhaji
bhaji

परळी वैजनाथ : शहरातील घरणीकर रस्त्यावर भाजी विकण्यासाठी बसलेल्या भाजीपाला विक्रेत्यांच्या विरोधात मंगळवारी (ता. 13)  या रस्त्यावरील रहिवाशांनी रास्तारोको करून ठिय्या मांडला. 

येथील घरणीकर रस्त्यावर रहिवाशी व मोठ्या प्रमाणावर व्यापारी आहेत. शहरात भाजीपाला विक्रेत्यांसाठी स्वतंत्र मार्केट उपलब्ध नाही. त्यामुळे नगरपरिषद ज्या रस्त्यावर जागा देईल त्या रस्त्यावर हे भाजीपाला विकणारे किरकोळ विक्रेते आपला व्यवसाय करतात. मागील काही दिवसांपासून हे भाजीपाला विक्रेत्यांना शहरातील घरणीकर रस्त्यावर जागा देण्यात आली होती. पण येथील रहिवाशांचे स्वतः ची दुकाने आहेत. त्यांच्या घरासमोर हे भाजीपाला विक्रेते बसतात. या रहिवाशांना स्वतः च्या घरात पण प्रवेश करता येत नाही. अशा अनेक कारणांमुळे मागील काही दिवसांपासून यांच्यात संघर्ष सुरू होता.

आज हा संघर्ष रस्त्यावर आला आहे. सकाळपासूनच येथील रहिवाशांनी आपली दुकाने बंद ठेवून रास्तारोको केला आहे. हे रहिवासी आपल्या संपूर्ण परिवारासह रस्त्यावर ठाण मांडून बसले आहेत. नगरपालिकेने या सर्व भाजीपाला विक्रेत्यांना कुठेतरी कायमस्वरुपी जागा देण्याची मागणी विक्रेत्यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com