सरकारला सद्‌बुद्धी दे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

बीड - पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर आरक्षणाचा निर्णय घेऊ, असे आश्वासन देणाऱ्या सरकारला चार  वर्षे उलटून गेली. येत्या हिवाळी अधिवेशनात तरी धनगर आरक्षण देण्याची सरकारला सुबुद्धी द्यावी, या मागणीसाठी रविवारी (ता. १८) यशवंत सेनेने मेंढरांची आरती करून भंडारा उधळला. आंदोलनात महिलांचाही सहभाग होता. 

येळकोट येळकोट जय मल्हार, बिरुबादेवाच्या नावानं चांगभलं अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. सरकार धनगर आरक्षणाबाबत चालढकल करीत आहे. टिस संस्थेने अहवाल देऊनही त्याची अंमलबजावणी केली जात नाही, असा यशवंत सेनेचा आरोप आहे. पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देणाऱ्या सरकारने चार वर्षे या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. 

अभ्यासाच्या नावाखाली सरकारने समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. धनगर समाजाच्या आरक्षणाची केंद्राकडे शिफारस करून पाठपुरावा करून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, असे भारत सोन्नर म्हणाले. 

यावेळी रणजित खांडेकर, अशोक भावले, श्री. तागड, लकडे रामचंद, अशोक लकडे, माणिक लकडे, अरुण भावले, मीरा लकडे, केशर भावले, विमल लकडे आदींचा सहभाग होता.

मेंढपाळांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या - देवकते 
मेंढपाळ हा धनगर समाजातील प्रमुख घटक आहे. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचे मेंढपाळांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. शासनाच्या मेंढळपाळांच्या संदर्भातील योजना कागदोपत्रीच आहेत. या योजनांची तत्काळ अंमलबजावणी करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा युवा मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू देवकते यांनी दिला. मेंढपाळांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाने द्यावे, वनविभागाने मेंढ्यांचे चराई क्षेत्र रिकामे करावे, अशा मागण्या त्यांनी केल्या.

Web Title: Agitation for Dhangar Reservation Yashwant Sena