जनावरं चारायला, चला पाहुण्याच्या गावाला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

औरंगाबाद : नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी केलेल्या वक्‍तव्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता.सात) शिवसेनेच्यावतीने भाजप कार्यालयासमोर जनावरे बांधण्याचे अनोखे आंदोलन केले. "आपली जनावरं चारायला, चला पाहुण्याच्या गावाला' अशा घोषणा देत जनावरे घेऊन शिवसैनिक निघाले असता पोलिसांनी आंदोलकांना रस्त्यातच अडविले. त्यांच्याकडील तीन बैल ताब्यात घेतले आणि कार्यकर्त्यांना अटक केली. 

जनावरांना चारा नाही असे गाऱ्हाणे घेऊन एक शिष्टमंडळ राम शिंदे यांना भेटायला गेले होते. त्यावर त्यांनी "जनावरांना चारा नसेल, तर त्यांना पाहुण्याकडं पाठवा' असे विधान केले होते. याचा पशुपालकांकडून तीव्र निषेध करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी शिवसैनिकांनी दुपारी चार वाजता चारापाण्याअभावी उपासमार होत असलेल्या जनावरांना घेऊन अनोखे आंदोलन केले. उस्मानपुरा येथील भाजप कार्यालयापुढे ही जनावरे बांधण्याचा बेत होता. आम्ही कुठल्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ देणार नाही, शांततेत जाऊ आणि गुरे सोडून येऊ, अशी विनंती देखील अंबादास दानवे यांनी पोलिसांना केली. मात्र, क्रांती चौक पोलिसांनी दानवे यांच्यासह 30-35 शिवसैनिकांना अटक केली होती. यामुळे वातावरण काहीकाळ तणावपूर्ण झाले होते. 

कृष्णा पाटील डोणगावकर, नरेंद्र त्रिवेदी, विश्‍वनाथ स्वामी, गोपाल कुलकर्णी, राजू दानवे, अनिल जैस्वाल, संतोष जेजुरकर, विजय वाघचौरे, अविनाश गलांडे, बाप्पा दळवी, दिग्विजय शेरखाने, अंबादास म्हस्के, संजय बारवाल, संदेश कवडे, चंद्रकांत इंगळे, वसंत शर्मा, रतन साबळे, अनिल जैस्वाल, रमेश बाहुले, मनोज कांबळे, ज्ञानेश्‍वर डांगे, अनिल मुळे, प्रमोद ठेंगडे, पराग कुंडलवाल, योगश साबळे, किसन गणिते, शिवकुमार भालसिंग, सूर्यकांत देवकर, अशोक तवाळ आदी आंदोलनात सहभागी झाले होते. 

पाहुण्यांकडे जाऊ द्या... 
सरकारमधील एका मंत्र्याने जनावरांना चारा नसेल तर त्यांना पाहुण्यांकडे नेऊन सोडा असा सल्ला दिला होता, भाजप आमचा पाहुणा असल्यामुळे आम्हाला तीन दिवसांपासून उपाशी असलेली गुरं भाजपच्या कार्यालयावर नेऊन सोडू द्या, अशी मागणी श्री. दानवे यांनी पोलिसांकडे केली होती. 

Web Title: agitation in front of BJP office