धनगर आरक्षणासाठी गेवराईत धरणे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासह समाजाच्या विविध प्रश्नांवर शुक्रवारी (ता. 10) येथे दुचाकी फेरी काढून तहसिल कार्यालयासमोर धरणे धरण्यात आले. 

गेवराई : धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासह समाजाच्या विविध प्रश्नांवर शुक्रवारी (ता. 10) येथे दुचाकी फेरी काढून तहसिल कार्यालयासमोर धरणे धरण्यात आले. 

धनगर समाजाला अनुसूचित जमातीप्रमाणे आरक्षण द्यावे, सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव दिलेले असून त्याची अंमलबजावणी करावी, आरक्षणासाठी बलीदान दिलेल्या परमेश्वर घोंगडे यांच्या कुटुंबियाला पन्नास लाख रुपयांची मदत द्यावी, धनगर सामाजाच्या विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती वाटप करावी, शेळी - मेंढी विकास महामंडळास पन्नास कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. दुचाकी फेरी काढून ग्रामीण भागातील समाजाचे तरुण आंदोलनात सहभागी झाले.

Web Title: agitation in gevrai by dhangar community