संपकऱ्यांचे परभणी जिल्हा कचेरीसमोर आंदोलन

parbhani
parbhani

परभणी : जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी व कामगारांनी राष्ट्रव्यापी संपात सहभागी होत मंगळवारी (ता. 8) परभणी जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन केले. आंदोलकांनी कामगार एकजुटीचा नारा देत केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणांना विरोध दर्शविला.

केंद्रीय कामगार व कर्मचारी कृती समितीने राष्ट्रव्यापी संपाचे आवाहन केले होते. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील बहूतांश शासकीय, निमशासकीय कर्मचारी तसेच कामगार संपात सहभागी झाले आहेत. 

मंगळवारी विविध क्षेत्रातील कर्मचारी जिल्हा कचेरीसमोर एकत्र आले. त्यांनी हम सब एक है, कामगार एकजुटीचा विजय असो, अशा घोषणा देत शासकीय धोरणाला विरोध केला. काही कर्मचा-यांनी मनोगत व्यक्त केले. अॅड. माधुरी क्षीरसागर, मोहन शर्मा, सी.एन. देशमुख, कृष्णा भोयर, महेश जोतराव, पंकज पतंगे, किशोर गायकवाड, रत्नदीप नवघडे, राजरत्न कांबळे, बाळासाहेब कदम, विठ्ठल घाडगे, अमोल सोळंके, गजानन भोकरे, सोपान देसाई, सुरेश लुटे, शेख कादर यांच्यासह आदी कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते. 
संपात सरसकट संघटना सहभागी झाल्या नाहीत. त्यामुळे शासकीय कार्यालये बंद नाहीत. परंतु हजर कर्मचा-यांवर कामाचा संपूर्ण भार असल्याने कामावर मोठा परिणाम झाला आहे. 

संपात सहभागी संघटना
जिल्ह्यातील संपात आंदोलनात ऑल इंडीया बँक एम्पलॉईज असोसिएशन, बँक एम्पलॉईज फेडरेशन ऑफ इंडीया, ऑल इंडीया इन्शुअरन्स एम्प्लॉईज एसोसिएशन, ऑल इंडीया एलआयसी एम्प्लॉईज फेडरेशन, ऑल इंडीया पोस्टल एमप्लाईज युनीयन,  महावितरण, आयटकप्रणित जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटना, अखिल भारतीय किसान सभा, केमीस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, भारतीय किसान संघ, हमाल व मापाडी युनियन यांच्यासह अनेक संघटना संपात सहभागी झाल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com