रिलायन्स कंपनीविरोधात परभणी जिल्ह्यात बंद; शाळांनाही सुट्टी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

गत 2017 च्या खरिप हंगामात जिल्हा प्रशासन, कृषि विभाग व रिलायन्स  विमा कंपनीने चुकीचे अहवाल तयार करुन शेतकऱ्यांना पिक विम्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप करीत ता.26 जून पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी उपोषण करीत आहेत.

परभणी : गत हंगामातील शेतकऱ्यांना पिक विमा देऊन रिलायन्स विमा कंपनीविरोधात गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी सुरु केलेल्या आंदोलनाची धार आता तिव्र झाली असून गुरुवारी (ता.पाच) जिल्हाभरात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या जिल्हा बंद आंदोलनाचा परिणाम शाळावर झाला आहे. परभणी, पूर्णा,सोनपेठ,पाथरी, सेलू  आदी शहरातील शाळांनाही सुट्टी देण्यात आली.

गत 2017 च्या खरिप हंगामात जिल्हा प्रशासन, कृषि विभाग व रिलायन्स  विमा कंपनीने चुकीचे अहवाल तयार करुन शेतकऱ्यांना पिक विम्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप करीत ता.26 जून पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी उपोषण करीत आहेत. याची दखल घेतली जात नसल्याने बुधवारी (ता.चार) जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले.गुरुवारी (ता.पाच) जिल्हा बंदची हाक दिली होती.

त्यानुसार आज सकाळपासून परभणी शहरासह जिल्हाभरातील बहुंताष ठिकाणची बाजारपेठ बंद राहीली.बंदचा परिणाम शाळांवर झाला आहे.परभणी, पूर्णा,सोनपेठ,पाथरी, सेलू येथील शाळांना सकाळी नऊच्या सुमारास सुट्टी देण्यात आली.संपूर्ण बाजारपेठ बंद करण्यासाठी कार्यकर्त्ये शहरात फिरत आहेत.

Web Title: agitation in Parbhani against Reliance company