परभणी जिल्हा कचेरीत पिठलं-भाकरी खाऊन आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

परभणी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने ऊस उत्पादकांनी मंगळवारी (ता.8) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पिठलं-भाकरी खावून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. त्यांनी गंगाखेड शुगर लिमीटेड कारखान्याकडे ऊस बिलांची थकीत रक्कम देण्याची मागणी केली.  

गंगाखेड शुगरने प्रारंभी दोन हजार 200 रूपये टन भाव देण्याचे आश्वासन देवून ऊस नेला. परंतु काही दिवसानंतर शेतक-यांना दिड हजार रूपये प्रतिटनाप्रमाणे बिले दिली. वास्तविक ऊस नेल्यावर 14 दिवसांच्या आत एक रक्कमी एफआरफी प्रमाणे रक्कम देणे बंधनकारक असते. तरीही वर्ष होत असताना अद्यापही थकीत बिलाचा पत्ता नाही. म्हणून कारखान्याने जाहीर केलेल्या बिलातील राहिलेली रक्कम 10 डिसेंबर 2018 पूर्वी देण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. अन्यथा 11 डिसेंबरपासून बेमूदत उपोषणाचा इशारा आंदोलकांना पिठलं-भाकरी खावून दिला. आंदोलकांनी भाषणातून मनोगत व्यक्त केले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशो ढगे, डिगांबर पवार, दिपक भालेराव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. 

Web Title: agitation in parbhani district office