औरंगपुरा व गांधीनगर येथील समस्यांसाठी भाकपचे आंदोलन 

Agitation for the problems of Aurangpura and Gandhinagar
Agitation for the problems of Aurangpura and Gandhinagar

औरंगाबाद : औरंगपुरा आणि गांधीनगर येथील नागरी समस्यांच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे महापालिकेसमोर जोरदार निदर्शने करण्यात आले.

महापालिकेच्या नकारात्मक धोरणांमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने वारंवार मनपाला निवेदने दिली आहेत. मात्र, अद्याप उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे जोरदार आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली. 

आठ दिवसात या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर महापौर बंगल्यावर हंडे घेऊन पाणी भरण्यास येऊ असा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनात जिल्हा सेक्रेटरी अश्फाक सलामी, जिल्हा सहसेक्रेटरी अॅड. अभय टाकसाळ, मनीषा भोळे, अनिता हिवराळे, राजु हिवराळे, संग्राम कोरडे, सय्यद सलीम, मेहमूद बक्ष, अतिश कांबळे यांच्यासह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.


Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com