रेल्वे सहाय्यक चालकांचे औरंगाबादेत धरणे 

अनिल जमधडे 
सोमवार, 18 फेब्रुवारी 2019

औरंगाबाद : ऑल इंडीया लोको रनिंग स्टॉफ असोसिएशन तर्फे देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून रेल्वेस्थानकावर जोरदार निदर्शने करण्यात आले. 
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील डिझेल चालक आणि सहाय्यक चालकांनी आपल्या विविध मागण्यासाठी सोमवारी (ता. 18) रेल्वेस्थानकावर धरणे आंदोलन करण्यात आले. 

ऑल इंडिया लोको रनिंग स्टॉफ असोसिएशनतर्फे विविध मागण्यांसाठी सोमवारी देशपातळीवर आंदोलन करण्यात येत आहे. दिल्ली येथे आंबेडकर भवन ते संसद भवनापर्यंत भव्य रॅली काढून धरणे देण्यात येणार आहेत. त्याचाच भाग म्हणून नांदेड विभागातील नांदेड, पूर्णा, अकोला, अदिलाबाद आणि औरंगाबाद रेल्वे स्थानकावर डिझेल चालक आणि सहाय्यक चालकांचा क्रु चेंज होतो. त्यामुळेच या पाच स्थानकावर आंदोलन करण्यात आले.

डिझेल चालकांचे किलोमिटर प्रमाणे (मायलेज) भत्ते निर्धारित करावेत, मुख्य चालका प्रमाणेच सहाय्यक चालकांनाही भत्ता निश्‍चित करावा, रनिंग स्टॉफ मधून सेवा निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पद्धतीने पेन्शन देण्यात यावी. या मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. आंदोलनात औरंगाबाद अध्यक्ष प्रकाशसिंह, प्रदिप गुप्ता, आनंद कुमारसिंग, श्रीराज अवसरमल, स्वतंत्र कुमार, गोविंद साहु यांचा सहभाग होता. 

Web Title: agitation by railway assistant motorman in aurangabad