शाहू आभियांत्रिकीचा कृषी विद्यापीठासोबत करार 

Agreement with Shahu Engineering of Agriculture University
Agreement with Shahu Engineering of Agriculture University

औरंगाबाद : छत्रपती शाहू अाभियांत्रिकी महाविद्यालय आणि परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्यामध्ये कृषी तंत्रज्ञानाबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. याद्वारे शेती अभियांत्रिकी, शेती रोबोटिक्‍समध्ये संशोधन तसेच, शेती प्रकल्पामध्ये स्वयंचलित तंत्रज्ञान विकसीत करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. 

छत्रपती शाहू आभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे म्हणाले, शेतीकरिता स्थानिक गरजेनुसार स्वदेशी बनावटीची स्वयंचलित अवजारे बनविण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत होणार आहे. पाणीपातळी वाढविण्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकी व माती परिक्षण करण्यासाठी संगणक क्षेत्राच्या माध्यमातून सॉफ्टवेअर तयार करण्यात येणार आहे. यासाठी संस्थेचे सचिव पद्माकरराव मुळे, अध्यक्ष रणजीत मुळे, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख यांनी प्रोत्साहन दिले.

सामंजस्य करार करताना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. बी. वेंकटेश्‍वरलू, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे, यंत्र अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. आर. पी. चोपडे, डॉ. डी. एच. पाटील, प्रा. आर. ए. खके, डॉ. गोपाल शिंदे यांची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com