esakal | कृषी आयुक्तालयाचे पथक लातुरात दाखल, विभागातील बदल्यांची चौकशी सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

krushi vibhag

लातूर कृषी विभागातील बदल्यांची चर्चा राज्यभर गाजल्यानंतर कृषी आयुक्तालयाचे एक पथक बुधवारी (ता.१९) लातुरात दाखल झाले आहे. येथील कृषी सहसंचालक कार्यालयात बुधवारी दुपारी दाखल झाल्यानंतर त्यांनी बदल्या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.

कृषी आयुक्तालयाचे पथक लातुरात दाखल, विभागातील बदल्यांची चौकशी सुरु

sakal_logo
By
हरी तुगावकर

लातूर : लातूर कृषी विभागातील बदल्यांची चर्चा राज्यभर गाजल्यानंतर कृषी आयुक्तालयाचे एक पथक बुधवारी (ता.१९) लातुरात दाखल झाले आहे. येथील कृषी सहसंचालक कार्यालयात बुधवारी दुपारी दाखल झाल्यानंतर त्यांनी बदल्या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. एक ते दोन दिवस हे पथक राहण्याची शक्यता आहे. लातूर कृषी विभागातील बदल्यातील अनियमितता, समुपदेशन न घेता बदल्या करणे आदी प्रकार घडल्यामुळे या बदल्या चर्चेत आल्या आहेत.

यात `सकाळ`ने सातत्याने प्रकाश टाकला आहे. याची दखल कृषी सचिव एकनाथ डवले यांनीही घेतली होती. त्यांनी कृषी आयुक्त धीरज कुमार यांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर पहिल्यांदा बदल्यांचे सर्व रेकॉर्ड घेऊन येथील अधिकाऱ्यांना पुण्याला बोलावले होते. पण त्यात तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन त्यांनी निर्णय बदलला. कृषी आयुक्तालयाचे एक पथकच त्यांनी बुधवारी लातुरला पाठवले आहे.

सततच्या पावसामुळे ऊस आडवे, मूग पाण्यात तर सोयाबीनवर आळीचा प्रादुर्भाव

या पथकात कृषी आयुक्त कार्यालयातील सहसंचालक सिसोदे, याच कार्यालयातील आस्थापना शाखेतील सुधीर ननावरे हे दोन महत्त्वाचे अधिकारी असून त्यांच्यासोबत काही सहायक अधिकारीही आले आहेत. त्यांनी दुपारी चार वाजल्यापासून चौकशी सुरु केली आहे. रात्री उशिरापर्यंत ही चौकशी सुरु होती. या चौकशीत ते बदल्या करताना शासनाच्या आदेशाचे पालन झाले आहे का?, बदल्यात सेवा ज्येष्ठता डावलली आहे का?, बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र लावली आहेत का?, बदल्यांची मुदत संपल्यानंतर आदेश का काढले? आणखी काय अनियमितता झाली आहे.

बीडच्या सीईओंनी घालवली दोन तास कोविड बाधितांसोबत, रुग्णांशी साधला संवाद

याची सर्व चौकशी हे पथक करण्याची शक्यता आहे. एक दोन दिवस हे पथक येथे राहून या संदर्भात असलेल्या सर्वच घटकांची चौकशीही करण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्यांचा अहवाल कृषी आयुक्त धीरज कुमार यांना सादर केला जाणार आहे. या चौकशीकडे बदलीपात्र कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
 

(संपादन : गणेश पिटेकर)

loading image
go to top