अहमदपूर तालुक्‍यातील साठ गावांत गारपीट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

अहमदपूर (जि. लातूर) - अहमदपूर तालुक्‍यातील तीन महसूल मंडळांत व आसपासच्या मिळून जवळपास साठ गावांतून मंगळवारी (ता. 13) गारपीट झाली. या गारपिटीमुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अहमदपूर (जि. लातूर) - अहमदपूर तालुक्‍यातील तीन महसूल मंडळांत व आसपासच्या मिळून जवळपास साठ गावांतून मंगळवारी (ता. 13) गारपीट झाली. या गारपिटीमुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दरम्यान, शहर तसेच तालुक्‍यात अनेक ठिकाणी विजेचे खांब उन्मळून पडले. विजेच्या ताराही तुटल्या आहेत. शहरात काल रात्री दहाला गेलेली वीज काही भागांत बुधवारी (ता. 14) सायंकाळी पाचपर्यंत आली नव्हती. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले. या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हरभरा, गहू, हळद, कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Web Title: ahmadpur news marathwada news hailstorm loss rain