चाकूर छाप्यांत बनावट दारूसाठीचे ३५ लाखांचे साहित्य जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmedpur 35 lakh counterfeit liquor seized raids Action

चाकूर : छाप्यांत बनावट दारूसाठीचे ३५ लाखांचे साहित्य जप्त

चाकूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने चाकूर व अहमदपूर येथे छापा टाकून बनावट दारू तयार करण्यासाठीचे ३५ लाख १४ हजार रुपयांचे साहित्य जप्त केले. दोन दिवस चाललेल्या या छापासत्रामुळे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने चाकूर येथील लातूर - नांदेड रस्त्यावरील एका बंद लॉजवर मंगळवारी (ता.५) दुपारी छापा टाकला. तेथे बनावट दारू भरण्यासाठीच्या बाटल्या, सील, स्टीकर, बॉक्स आदी साहित्य सापडले. त्याची किंमत २४ लाख ७६ हजार ८६९ रुपये आहे.

बुधवारी (ता.६) पहाटेपर्यंत याचे मोजमाप सुरू होते. अहमदपूर येथील मोळेवाडी रोड भागात टाकलेल्या छाप्यात १० लाख ३७ हजार ८२० रुपयांचे असेच साहित्य सापडले आहे. संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक गणेश बारजगे, निरीक्षक आर. एम. चाटे, आर. एम. बांगर, विजय राठोड, देवदत्त पाचपोळे, एल.बी. माटेकर, अमोल शिंदे, अनंत कारभारी, गणेश गोळे यांच्यासह १९ कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. एवढ्या मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आल्याने बनावट दारू कोठे तयार केली जात होती किंवा कुठून आणली जात होती, यात रॅकेट आहे का, याचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात येते.

Web Title: Ahmedpur 35 Lakh Counterfeit Liquor Seized Raids Action

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..