औरंगाबादेत वायूप्रदूषण धोकादायक पातळीवर

file photo
file photo

औरंगाबाद- शहरातील वायूप्रदूषण अद्याप धोकादायक पातळीवरच असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात औरंगाबाद शहराचा राज्यातून तिसरा क्रमांक असल्याचे समोर आल्यानंतर उपाययोजना हाती घेतल्या आहेत; मात्र त्याचा परिणाम झालेला नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सरस्वती भुवन येथील हवा गुणवत्ता तपासणी केंद्रात हवेतील धूलीकण मर्यादेपेक्षा दुप्पट आढळले आहेत, असे पर्यावरणतज्ज्ञ गीतांजली कौशिक यांनी सोमवारी (ता. 14) सांगितले. प्रदूषण कमी करण्यासाठी जनजागृतीचे काम सुरू आहे. तसेच हवेतील धूलीकणांचे प्रमाण मोजण्यासाठी "पीएम 2.5' केंद्रे चार ठिकाणी उभारण्याचे काम प्रगतिपथावर असल्याचे त्यांनी नमूद केले. 

शहरातील प्रदूषणाबाबत श्रीमती कौशिक यांनी सांगितले, की शहरातील हवेचे प्रदूषण धोकादायक असल्याचे केंद्राच्या अहवालातून समोर आल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने उपाय-योजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्याचा अहवाल केंद्राच्या समितीलाही सादर केला आहे. शहरात कडा कार्यालय, सरस्वती भुवन महाविद्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि वाळूज एमआयडीसी येथे हवा गुणवत्ता तपासणी केंद्र आहेत. यातील सरस्वती भुवन येथील केंद्रावरील हवेच्या प्रदूषणाची आकडेवारी 108 मायक्रो ग्रॅम पर मीटर क्‍यूब एवढी आहे. जी की धोकादायक आहे. हवा प्रदूषणाचा गुणवत्ता निर्देशांक हा सरासरी 50 ते 60 हा सर्वसाधारण मानला जातो; मात्र वाळूजसह शहराच्या चारही केंद्रांवरील आकडेवारी ही यापेक्षा अधिक असल्याचे कौशिक यांनी स्पष्ट केले. राज्यातील 18 शहरांचे प्रदूषण कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ऍक्‍शनमध्ये तीन टप्प्यात कामे केली जाणार आहेत. ही कामे एअर क्वॉलिटी मॉनिटरिंग कमिटीच्या माध्यमातून केली जात आहेत. त्यानुसार वार्षिक 10 कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. सध्या हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृतीवर भर दिला आहे. आतापर्यंत 15 शाळा महाविद्यालयांत महायुवा कॅम्पच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. तसेच हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी शहरात आणखी चार ठिकाणी केंद्र उभारण्याचे नियोजन आहे. देवगिरी महाविद्यालय, एमजीएम महाविद्यालय, पोलिस आयुक्त कार्यालय, प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालय येथे ही केंद्रे प्रस्तावित आहे. यासाठी प्रत्येकी एक कोटींचा खर्च येणार असल्याचे कौशिक यांनी सांगितले. ही केंद्र उभारल्यानंतर नागरिकांना आपल्या भागातील हवा किती प्रदूषित आहे, हे लक्षात येईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com