आकांक्षा देशमुखच्या खून प्रकरणी परप्रांतियाला अटक

मनोज साखरे
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

रात्रीतुन उत्तरप्रदेशात पसार
खोलीत येताच राहुलने आई आजारी असल्याचे नाटक करीत रेल्वेस्थानकात पोचत त्याने उत्तर प्रदेशकडे प्रयाण केले त्यानंतर तो दुधणी या मूळ गावी गेला. पोलिस पकडू नये म्हणून त्याने केस कापून वेशांतरही केले होते असे सूत्रांनी सांगितले.

औरंगाबाद : औरंगाबादेतील एमजीएमच्या गंगा वसतिगृहातील आकांक्षा देशमुख खून प्रकरणाचा उलगडा झाला. मुलींच्या वस्तीगृहाभोवतीच काम करणाऱ्या व मूळ उत्तर प्रदेशात राहणाऱ्या एका मजुराला पोलिसांनी अटक केली. त्याने आकांक्षा हीचा खून केल्याची कबुली दिल्याचे सूत्रांनी सांगितले. चोरी नंतर बलात्काराचा त्याचा प्रयत्न होता पण झटापटीत त्याने तिचा खून केल्याचे समोर आले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल शर्मा असे संशयिताचे नाव आहे. उत्तर प्रदेशात गेलेल्या पथकाने त्याला होता.पोलिसांनी उत्तर प्रदेश गाठून राहुलला कटनी ते जबलपूर येथून ताब्यात घेतले. तो मुंबईत पळून जात होता. गंगा वसतिगृहातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आकांक्षा हिचा खून झाल्याचा प्रकार 11 डिसेंबरला रात्री उघडकीस आले. यात आधीच कामगारांवर संशय घेतला जात होता तो खरा ठरला.

कसा केला असेल खून?
वस्तीगृहानजीक राहुल काम करीत होता, तेथून दिसणाऱ्या आकांक्षाच्या खोलीकडे त्याचे सारखे लक्ष होते. मनात चलबिचल असायची. त्यातून त्याने चोरी आणि बालात्कारासाठी 10 डिसेंबरच्या रात्री गुपचूप वसतिगृहाच्या गच्चीवर उडी घेत तेथेच तो थांबला. रात्री नेहमीप्रमाणे सडे नऊला वसतिगृहाची हजेरी झाली. त्यानंतर आकांक्षा वसतिगृहातील खोलीत आली. या दरम्यान वसतिगृहाच्या छतावर लपलेल्या राहुल ऱात्री साडेबारा वाजेच्या सुमारास आकांशाच्या खोलीत चोरीच्या आला. त्याची आकांक्षासोबत झटापट झाली. तिने त्याला प्रतिकार केला आरसा खाली आला व टेबलही झटापटीत पडला. त्याने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्नही केला. पण आकांक्षाकडून झालेला प्रतिकार पाहता त्याने तिचा तोंड व गळा दाबून खून केला. त्यानंतर बराच वेळ तो खोलीत होता मग पहाटे तिननंतर तो सिसिटीव्हीच्या कचटयातुन निघत वस्तीगृहापासून जवळच असलेल्या खोलीकडे तो गेला.

रात्रीतुन उत्तरप्रदेशात पसार
खोलीत येताच राहुलने आई आजारी असल्याचे नाटक करीत रेल्वेस्थानकात पोचत त्याने उत्तर प्रदेशकडे प्रयाण केले त्यानंतर तो दुधणी या मूळ गावी गेला. पोलिस पकडू नये म्हणून त्याने केस कापून वेशांतरही केले होते असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Akansha Deshmukh Murder case in Aurangabad one arrested