आकांक्षाचा संशयित मारेकरी राहुल शर्माच्या 'यूपी'तील गावी झाडाझडती

मनोज साखरे
शनिवार, 22 डिसेंबर 2018

दहा डिसेंबरला एमजीएम वस्तीगृहातील गंगा वसतिगृहात तिसऱ्या मजल्यावर राहणारी व वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आकांक्षा देशमुख (मूळ रा. माजलगाव, जि. बीड) या विद्यार्थिनींचा राहुल शर्मा याने गळा आवळून खून केल्याचे उघड झाले. एमजीएम परिसरात तो सेन्ट्रीग काम करीत होता. 

औरंगाबाद : बहुचर्चित आकांक्षा देशमुख खून प्रकरणी राहुल शर्मा या संशयिताला सिडको पोलिसांनी अटक केली. त्याला त्याच्या उत्तरप्रदेशातील मूळ गावी नेण्यात आले असून त्याच्या घराची झडती घेतली जाणार आहे. तसेच गावातही चौकशी केली जाणार आहे.

गावातील त्याचे वास्तव्य, तेथे त्याच्यावर या पूर्वी काही गुन्हे नोंद आहेत का यासह त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जाणार आहे. यासाठी स्थानिक पोलिसांची मदतही घेण्यात आली आहे. त्याची कौटुंबिक माहिती मिळवून पोलिस त्याच्या शैक्षणिक बाजूही तपासणार आहेत.

दहा डिसेंबरला एमजीएम वस्तीगृहातील गंगा वसतिगृहात तिसऱ्या मजल्यावर राहणारी व वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आकांक्षा देशमुख (मूळ रा. माजलगाव, जि. बीड) या विद्यार्थिनींचा राहुल शर्मा याने गळा आवळून खून केल्याचे उघड झाले. एमजीएम परिसरात तो सेन्ट्रीग काम करीत होता. 

Web Title: Akansha Deshmukh murder case police investigation