Photo : संमेलनात साकारले गोरोबांचे गाव

तानाजी जाधवर
रविवार, 12 जानेवारी 2020

'साहित्याची वारी, गोरोबांच्या दारी' हे संमेलन गीत जसे सगळ्यांच्या पसंतीस उतरले, अगदी तसेच चित्रण उभे करण्याचा प्रयत्न रसिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

उस्मानाबाद : संत गोरोबाकाका यांच्या भूमीत सुरू असलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांच्या विचारांचा वारसा  साहित्यिकांसमोर  वेगवेगळ्या प्रकाराने मांडण्याचा प्रयत्न चांगलाच यशस्वी झालेला दिसत आहे.

Image may contain: 2 people

'साहित्याची वारी, गोरोबांच्या दारी' हे संमेलन गीत जसे सगळ्यांच्या पसंतीस उतरले, अगदी तसेच चित्रण उभे करण्याचा प्रयत्न रसिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. संत गोरोबा काका यांच्या पारंपरिक कुंभार व्यवसायाचा देखावा पाहण्यासाठी साहित्यरसिकांची पावले आपोआपच तिकडे वळताना दिसत आहेत.

संत गोरोबा काकांचे घर, मडकी, तसेच मातीची भांडी, कुंड्या तयार करण्याचा सजीव देखावा, त्यासाठी लागणारी माती आणि इतर साहित्य, यासह प्रत्यक्ष चाकावर मातीला आकार देऊन होणाऱ्या मातीच्या विविध आकारातल्या कलाकृतींचे प्रात्यक्षिक इथे दाखवले जात आहे. या वस्तू तयार करण्याची कला आणि त्याचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी कलाशिक्षक शेषनाथ वाघ आणि राजेंद्र कुंभार यांनी हा देखावा उभारला आहे.

Image may contain: 2 people, people sitting

या देखाव्याच्या भोवती गर्दी जमत आहे. लहान मुलांना तर हा देखावा म्हणजे वेगळी पर्वणीच ठरताना दिसत आहे. शहरीकरण व ग्रामीण भागातही आता हे चित्र अभावाने दिसते, यानिमित्ताने मुलांना हा अनुभव घेता य़ेत आहे.

या शिवाय संमेलनात पुस्तकांमधून संत गोरोबाकाका यांची प्रतिकृती साकारण्यात आली असून, तीसुद्धा साहित्यप्रेमींसाठी उत्सुकतेचा विषय ठरला आहे. विविध पुस्तकांच्या विक्रीची जवळपास दोनशे दालनं उभारण्यात आली असून, जिल्ह्यासह इतर भागातून आलेले  साहित्यप्रेमी, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींनी खरेदीला उदंड प्रतिसाद दिला आहे.

हेही वाचा -
प्रख्यात रंगकर्मी डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांचे निधन 

" कलाग्राम 'वर अवतरली उद्योगनगरी   

या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले "तान्हाजी'त बदल  

मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Osmanabad News