उस्मानाबादकरांच्या उदंड प्रतिसादाने बहरली गावकथा : पाहा Photos

सयाजी शेळके
रविवार, 12 जानेवारी 2020

रंगदृष्टी (पुणे) निर्मित, बालाजी सुतार लिखित आणि संजय मोरे ठाकूर दिग्दर्शित जाणिवांचा जिवंत गाव 'गावकथा' ही ग्रामीण जीवनात येणाऱ्या अडचणींना वाचा फोडणारी नाटिका आहे.

संत गोरोबाकाका साहित्यनगरी (उस्मानाबाद) : मराठी साहित्य संमेलनात शनिवारी सादर झालेल्या 'गावकथा' या नाटकाला रसिकांनी भरभरून दाद दिली. या कार्यक्रमात गावातील व्यथांचे चित्र कलाकारांनी उभे केले.

रंगदृष्टी (पुणे) निर्मित, बालाजी सुतार लिखित आणि संजय मोरे ठाकूर दिग्दर्शित जाणिवांचा जिवंत गाव 'गावकथा' ही ग्रामीण जीवनात येणाऱ्या अडचणींना वाचा फोडणारी नाटिका आहे. शहरी जीवन सुसज्ज होत असताना ग्रामीण भागाला विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. गावशिवारातील शेतात पाणी आहे; पण वीज नाही, वीज आहे, तर पाणी नाही. त्यामुळे शेती आणि शेतकरी उद्‌ध्वस्थ होत असल्याची व्यथा कलाकारांनी मांडली. 

Image may contain: 3 people, people on stage and people playing musical instruments

लहानपणीचे ग्रामीण जीवन अत्यंत सुंदर, खेळकर कसे असते, याचेही सुरेख वर्णन यामध्ये केले आहे. शिक्षण घेऊनही ग्रामीण भागातील तरुणांना नोकरीअभावी लग्न वेळेवर करता येत नाही, हा गंभीर विषयही या कथेत येतो. 

Image may contain: 7 people, people smiling, people standing

सातत्याने पडणारा दुष्काळ, नापिकी यामुळे आलेले नैराश्‍य, घरात वाढणारा दैनंदिन खर्च, उत्पादनापेक्षा शेतातील वाढता खर्च, त्यासाठी घ्यावी लागणारी सावकाराची मदत, तरीही तोडकी अपेक्षा धरून घाम गाळणारा शेतकरी, पुन्हा त्याच्या वाट्याला आलेला दुष्काळ आणि अस्मानी संकटे... अशा अनेक समस्यांच्या चक्रव्यूहामध्ये अडकलेला घरातील कर्ता पुरुष मृत्यूला जवळ करतो आणि त्याचे कुटुंब उद्‌ध्वस्त होते. हे वास्तव गावकथेत गंभीरपणे मांडले आहे. गावातील पुढाऱ्यांची दादागिरी, यातून होणारे नुकसान याचीही मांडणी गावकथेतील कलाकारांनी केली.

Image may contain: 12 people, people smiling, people standing and indoor

ग्रामीण भागातील वास्तववादी व्यथा मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो. संमेलनात सादरीकरणाची संधी मिळाली. प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. उशिरापर्यंत प्रेक्षक थांबल्याने बरे वाटले. 
- विनोद वनवे, कलाकार. 

Image may contain: 2 people, people smiling, people standing

हेही वाचा -
प्रख्यात रंगकर्मी डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांचे निधन 

" कलाग्राम 'वर अवतरली उद्योगनगरी   

या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले "तान्हाजी'त बदल  

मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Osmanabad News