संमेलनामुळे गजबजली ऐतिहासिक तेर नगरी

आशिष तागडे
सोमवार, 13 जानेवारी 2020

सध्या तेर येथे त्रिविक्रम मंदिर, उत्तरेश्‍वर मंदिर, सिद्धेश्‍वर मंदिर, निळकंठेश्‍वर मंदिर, नृसिंह मंदिर, जैन मंदिर आहे. आणि सर्वांत महत्त्वाचे महत्त्वाचे म्हणजे संत गोरोबा काका यांचा वाडा आणि त्यांचे समाधी स्थळ. 

उस्मानाबाद : ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेले संत गोरोबा काकांचे तेर गाव गेल्या तीन दिवसांपासून साहित्यिक पर्यटकांनी गजबलेले आहे. संत गोरोबा काकांचा वाडा, समाधी मंदिराबरोबरच येथील संग्रहालय आणि पुरातन मंदिरे पाहून पर्यटक समाधानाची भावना व्यक्त करत आहेत.

Image may contain: text

तेर गावाला पुरातत्वीय इतिहास आहे. सातवाहन कालीन प्रसिद्ध व्यापारी केंद्र असलेले 'तगर' म्हणजे सध्याचे 'तेर' गाव होय. सातवाहनांचा काळ इ.स. 250 ते 227 असा आहे. म्हणजेच त्यांनी 475 वर्षे राज्य केले. या कालावधीत तीस राजे होऊन गेले. तेर येथील उत्खननात स्त्री-पुरुष मूर्ती, पक्‍क्‍या विटांची कौलारू घरे, सांडपाण्याची व्यवस्था आढळून आली आहे. येथील वस्तुसंग्रहालयाच्या नवीन इमारतीचा पाया खणत असताना एक बांधीव आड आढळला आहे. 

Image may contain: indoor

सध्या तेर येथे त्रिविक्रम मंदिर, उत्तरेश्‍वर मंदिर, सिद्धेश्‍वर मंदिर, निळकंठेश्‍वर मंदिर, नृसिंह मंदिर, जैन मंदिर आहे. आणि सर्वांत महत्त्वाचे महत्त्वाचे म्हणजे संत गोरोबा काका यांचा वाडा आणि त्यांचे समाधी स्थळ. 

Image result for तेर संग्रहालय उस्मानाबाद

संत गोरोबा काका यांचा वाडा राज्य शासनाने संरक्षित वास्तू म्हणून घोषित केला असून, त्या ठिकाणी तसा फलकही लावला आहे. या वाड्याची आणि संत गोरोबा यांच्या नित्यपुजेची जबाबदारी असलेल्या पुजारी आजींची या ठिकाणी भेट झाली. गेल्या दोन-तीन दिवसांत अनेक लोकांनी भेट दिल्याचे सांगत पुजारी आजी म्हणाल्या, "आम्ही या घराची देखभाल आणि नित्य पूजा करतो. या अंगणात रोज सडा-रांगोळी काढल्याशिवाय चैनही पडत नाही. या वाड्याला भेट देण्यासाठी शुक्रवारपासून गर्दी होत आहे. सध्या सुरू असलेल्या कार्यक्रमानंतरही लोकांनी आवर्जून भेट देण्याचा आग्रह करण्यास या आजी विसरत नव्हत्या.

Image may contain: outdoor

दरम्यान, तेर नदी किनारी असलेल्या संत गोरोबाकाकांच्या समाधी स्थळालाही साहित्यिक भेट देत होते. परिसरात पुढील आढवड्यात यात्रा सुरू असून त्यानिमित्ताने मंदिराला विद्युत रोषणाई करण्याचे काम सुरू आहे. या परिसरातील स्वच्छता नजरेत भरत होती.

Image result for तेर संग्रहालय उस्मानाबाद

हेही वाचा -

प्रख्यात रंगकर्मी डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांचे निधन 

कलाग्रामवर अवतरली उद्योगनगरी   

या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले "तान्हाजी'त बदल  

मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Osmanabad News