दिब्रिटो अन् महानोर यांना पोलीस सरंक्षण : संमेलनाभोवती पोलिसांचे सुरक्षा कडे

सुशांत सांगवे
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ग्रंथदिंडीने सुरवात झाली आहे. पण त्याआधीच पोलिसांनी या चारही मान्यवरांना पोलीस सरंक्षण पुरविले आहे. संमेलनाच्या पूर्वसंध्येला महानोर यांना 'संमेलनाला जावू नका', अशी धमकी दूरध्वनीवरून देण्यात आली.

संत गोरोबा काका साहित्यनगरी, उस्मानाबाद : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो, संमेलनाचे उदघाटक कविवर्य ना. धों. महानोर, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांना पोलीस संरक्षण पुरविण्यात आले आहे. संमेलन शांततेत व्हावे म्हणून संमेलनस्थळाभोवतीही पोलिसांनी सुरक्षा कडे तैनात केले आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ग्रंथदिंडीने सुरवात झाली आहे. पण त्याआधीच पोलिसांनी या चारही मान्यवरांना पोलीस सरंक्षण पुरविले आहे. संमेलनाच्या पूर्वसंध्येला महानोर यांना 'संमेलनाला जावू नका', अशी धमकी दूरध्वनीवरून देण्यात आली.

हेही वाचा - फादर फ्रान्सिस दिब्रिटो काय म्हणतात?

दिब्रिटो यांच्या अध्यक्षपदाला ब्राह्मण संघटनेने विरोध दर्शवले आहे. त्यामुळे वाद सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे.

संमेलन ही वाद विवाद होण्याची नव्हे तर संवादाची जागा आहे. दिब्रिटो यांची लोकशाही पद्धतीने निवड झाली आहे. त्यामुळे विरोध करणे चुकीचे आहे. विरोध करायचाच असेल तर लोकशाही मार्गाने करावा. संमेलन ही वादाची जागा नाही, असे महानोर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक मनोज निलंगेकर यांनी संमेलनस्थळी कडेकोट पोलीस सुरक्षा तैनात करण्यात आली आहे, असे सकाळ ला सांगितले.

वाचा - भालचंद्र नेमाडे यांना का दिले निमंत्रण?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Osmanabad News Na Dho Mahanor