साहित्याला जात,धर्म पंत नसतो : शरद पवारांच्या साहित्य संमेलनास शुभेच्छा

तानाजी जाधवर
Saturday, 11 January 2020

मराठवाड्याच्या वारसा सांगताना त्यांनी चक्रधर स्वामी, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर माऊली व संत भगवान बाबा यांचा आवर्जुन उल्लेख केला आहे.

उस्मानाबाद : साहित्याला जात, धर्म, पंथ नसतो हे मराठवाड्याच्या मातीने दाखवून दिले आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड ही या परंपरेला धरुन आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. 

धर्म आणि साहित्याची गल्लत नको : महानोर

स्मानाबाद येथे सुरु असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची अध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल त्यांनी साहित्य महामंडळाचे काैतुक केले आहे.

Image may contain: 11 people, people smiling, people standing

Video : साहित्य संमेलनातच आढळली पायरटेड पुस्तके  

मराठवाडा ही सर्व पंथीयांच्या सहवासाने समृध्द झालेली भूमी असल्याचे श्री. पवार यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. मराठवाड्याच्या वारसा सांगताना त्यांनी चक्रधर स्वामी, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर माऊली व संत भगवान बाबा यांचा आवर्जुन उल्लेख केला आहे.

संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्रे चांदीचे पदकाने प्रदान करणार

यंदाचे साहित्य संमेलन हे संत गोरोबा काकांच्या जिल्ह्यात होत असल्याबद्दल मनापासून समाधान व्यक्त करतानाच, साहित्याला जात, धर्म, पंथ नसतो हे मराठवाड्याच्या मातीने दाखवून दिले आहे. अध्यक्षपदी निवडलेले फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड ही या परंपरेला धरुन आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा -

साहित्य संमेलनात वादग्रस्त पुस्तकाची विक्री, प्रकाशक-पोलिसांमध्ये वाद

प्रत्येक तालुक्यात पुस्तक विक्री केंद्र सुरू करा, विक्रेत्यांची मागणी

  Video : अशी निघाली साहित्याची उस्मानाबादेत ग्रंथदिंडी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Osmanabad News Sharad Pawar News