म्हणे जूने वाण शेतकरी घेणारच!

म्हणे जूने वाण शेतकरी घेणारच!

महाबीजच्या नवीन वाणालाच अनुदान; जुन्या वाणासाठी केंद्राने प्रस्ताव नाकारला

अकोलाः खरीप हंगामासाठी लागणारे महाबीजचे जूणे वाण प्रचलीत असून, शेतकरी ते आपसूकहून घेतातच. मात्र, नवीन वाणाची ओळखसुद्धा होणे गरजेचे आहे. त्यामुळे महाबीज प्रशासनाने केंद्राकडे मागणी केलेल्या १५ वर्षावरील बियाणाला अनुदान देण्यास केंद्राने नकार दिला आहे. नवीन वाणासाठी मात्र, प्रतिक्विंटल दोन हजार ५०० रुपये अनुदान मिळणार असून, त्याची उपलब्धता केवळ २० टक्के झाली आहे.

एकीकडे शेतमालाला भाव नाही आणि बॅंका पीक कर्जही द्यायला तयार नाहीत. यामुळे जिल्ह्यातील ८० टक्के शेतकरी आर्थिक संकटाला तोंड देत आहेत. आता मॉन्सून तोंडावर आला आहे. खरीपाच्या तयारीला लागलेल्या शेतकऱ्यांना महाबीजकडून बियाणामध्ये अनुदान मिळेल अशी आशा होती. आर्थिक चणचन सोसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून, महाबीज प्रशासनाने, उपलब्ध केलेल्या १५ वर्षावरील जूण्या वाणांना अनुदान मिळावे याकरिता केंद्राकडे प्रस्ताव सादर केला होता. मात्र, गुरुवारी मुंबईला झालेल्या बैठकीमध्ये, ही वाणे शेतकऱ्यांमध्ये प्रचिलीत असून, त्यांना अनुदान न देताच मागणी होत असल्याचे सागण्यात आले. त्यामुळे नवीन वाणाला प्रसिद्धी मिळावी, त्यांचा विकास व्हावा व शेतकऱ्यांनी या वाणाच्या खरेदीवर जोर द्यावा म्हणून, केंद्राने केवळ १५ वर्षाआतील वाणांना अनुदान देण्यासाठी मान्यता दिली आहे.

या बियाणाला अनुदान नाही
राज्यात सर्वाधिक प्रचलीत व मागणीच्या सोयाबीन ३३५, उडीद टीएयू-१, तुरीमध्ये मारोती, आशा, बीएसएमआर-५३६, मूग कोपरगाव, धान एमटीयू १०-१० या बियाणांचा समावेश असून, यांची उगवण क्षमतासुद्धा चांगली आहे.

नवीन वाण आधिच अनुदानित
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गन नवीन वाणाला अनुदान आधिच मंजूर झाले होते. मात्र, जुन्या बियाणासाठी सुविधा नव्हती. या वाणालाही अनुदान मिळाले तर आर्थिक टंचाईला सामोरे जात असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल या अपेक्षेणे महाबीज प्रशासनाने केंद्राकडे तशा मागणीचा प्रस्ताव सादर केला होता.

केवळ २० टक्के बियाणे अनुदाणीत
महाबीज प्रशासनाने यंदा खरीपासाठी सहा लाख ५३ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करून दिले आहे. त्यापैकी ८० टक्के वाण जूणे असून, राज्यभरात त्यांना अधिक मागणी होते. मात्र, या बियाणाला केंद्राने अनुदान नाकारले असून, उपलब्ध असलेल्या नवीन २० टक्के वाणाला अनुदान देण्यासाठी मंजूरी दिली आहे.

या वाणाला अनुदान
सोयाबीनचे ९३०५, एमएयूएस-७१, १५८, १६२, उडिदाचे एकेयू १५, मुगांचे व्हीएम-२,१, तुरीचे बीएमएन ७११, पीकेव्ही तारा, महाबीजच्या केवळ या वाणालाच अनुदान मिळणार आहे. त्यानुसार प्रतिक्विंटल २५०० अनुदान मिळणार आहे. अनुदानित बिणायामध्ये सोयाबीचे एक लाख क्विंटल व उडिद, मूग, तुरीचे ३० हजार क्विंटल बियाणे प्रशासनाने उपलब्ध करून दिले आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत जुने बियाणाचे दर २० ते ३० टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना अधिक लाभ व्हावा म्हणून, १५ वर्षावरील बियाणालासुद्धा अनुदान मिळावे म्हणून, प्रस्ताव सादर केला होता. प्रस्ताव मंजूरही झाला होता. मात्र, जून्या बियाणाला अनुदान देण्यास केद्राने नकार दिला आहे. मात्र, प्राप्त झालेला २५ कोटीचा निधी रब्बीमध्ये उपयोगात आणता येऊन, शेतकऱ्यांना लाभ मिळवून देता येईल.
- रामचंद्र नाके, विपणन व्यवस्थापक, महाबीज, अकोला

ताज्या बातम्याः

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com