वाहन तपासणीत दारूची हजेरी!

traffic-police.jpg
traffic-police.jpg

नांदेड : शहरातील वाहनांच्या तपासणी दरम्यान अनधिकृतपणे बिनापरवानगी दारु घेऊन जाणाऱ्या दोघांकडून वाहतुक पोलिसांनी अठरा हजाराची दारु आणि एक दुचाकी असा पंचेचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई आयटीआय चौक परिसरात गुरूवारी (ता. 11) दुपारी करण्यात आली. 

गुरूवारी (ता. 11) आयटीआय चौकात वाहन तपासणी दरम्यान एका दुचाकीला पोलिसांनी थांबविले. यावेळी या दुचाकीस्वाराकडे एक पिशवी आढळून आली. पोलिसांनी तपासणी केली असता त्यात मॅकडॉल कंपनीची दहा हजार आठशे रुपयाची दारु आणि आयपी कंपनीची सहा हजार सातशे वीस रुपयाची असा अठरा हजाराचा मुद्देमाल आणि दुचाकी जप्त केली. तसेच दुचाकीस्वार सुमेध नरवाडे (रा. कामठा ता. कळमनुरी जि. हिंगोली) आणि संतोष कोरडे रा. कोळी ता. हदगाव (जि. नांदेड) या दोघांना ताब्यात घेवून शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. सहाय्यक फौजदार दीप भंडारे यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिस ठाणयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली.

शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतुक पोलिस जागोजागी नाकाबंदी करून वाहन तपासणी करीत आहेत. अनेक वाहनचालकांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतो. तसेच अनेक अॅटोचालक वाहतुक नियम डावलून आपली ॲटो शहरात बिनधास्तपणे चालवितात, यासोबतच काही रोड रोमीयो गर्दीच्या आणि खासगी शिकवणी भागात दुचाकींची स्टंटबाजी करतात.

अशा वाहनधारकांवर कारवाई करण्यासाठी आणि वाहतुकिला शिस्त लावण्यासाठी वाहतुक शाखेच्या वतीने पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली काकसाहेब रोडके, विनोद पवार, सरदार मान, सुर्यकांत कदम, बालाजी कुडमेथे, अविनाश धुमाळ, किर्तीकुमार कवठेकर, शेख चाऊस यांनी वेगवेगळ्या चौकात वाहन तपासणी मोहीम हाती घेतली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com