युती कधी होईल हे कोणाला कळणारही नाही : देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

बीड : लोकसभा निवडणुकीआधाही भाजप-शिवसेना युतीबाबत माध्यमांनी चर्चा केली; पण आम्ही एकाच दिवसात जागावाटप करून युतीचीही घोषणा केली. विधानसभेसाठीही युती कधी होईल हे कोणाला कळणारही नाही, असे म्हणत युती पक्की असल्याचे स्पष्ट संकेत

बीड : लोकसभा निवडणुकीआधाही भाजप-शिवसेना युतीबाबत माध्यमांनी चर्चा केली; पण आम्ही एकाच दिवसात जागावाटप करून युतीचीही घोषणा केली. विधानसभेसाठीही युती कधी होईल हे कोणाला कळणारही नाही, असे म्हणत युती पक्की असल्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. महाजनादेश यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याने रस्त्यांवरही सभा घ्याव्या लागत असल्याचे सांगून विरोधकांच्या यात्रांची त्यांनी खिल्ली उडविली. विरोधकांच्या यात्रांची सुरवात मंगल कार्यालयात आणि सभा छोट्या सभागृहांत होत असल्याचे ते म्हणाले. 

महाजनादेश यात्रेनिमित्त जिल्ह्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी (ता. 27) येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, "भाजपमध्ये मेगा भरती, तर विरोधकांची मेगा गळती सुरू आहे. भाजप प्रवेशाबाबत आचमी "फील्ट्रेशन पॉलिसी' आहे. जे लोक जास्त दिवस आमच्यासोबत राहू शकतात, जिथे आमच्या वाट्याची जागा आहेत, अशाच ठिकाणी आम्ही प्रवेश देत आहोत. काही ठिकाणी मित्रपक्ष शिवसेनेत प्रवेश होत आहेत.' 

महाजनादेश यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. स्वगातासाठी रस्त्यांवर गर्दी होत आहे. अशा गर्दीच्या ठिकाणीही सभा घ्याव्या लागत आहेत. कॉंग्रेसला त्यांच्या यात्रेची सुरवात मंगल कार्यालयात करून सभा छोट्या सभागृहांत घ्याव्या लागत आहेत. यातूनच त्यांचा पर्दाफाश होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवस्वराज्य यात्रेसह संवाद यात्रा काढली आहे. सत्तेत असताना त्यांनी लोकांशी संवाद साधण्याऐवजी स्वत:शीच संवाद साधला नाही. त्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आल्याचे ते म्हणाले. 

मराठवाडा दुष्काळमुक्त करणार 
मराठवाड्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी कोकणातून समुद्रात वाहून जाणारे 167 टीएमसी पाणी आणले जाईल. यातील 25 टीएमसी पाणी आणण्याची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. मराठवाड्याच्या हक्काचे कृष्णा खोऱ्यातील पाणी आष्टी व इतर भागांत बोगद्याद्वारे आणले जात आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

मुख्यमंत्री कुठे काय म्हणाले? 
 बीड ः विधानसभेसाठी युती पक्की असल्याचे सुतोवाच, विरोधकांच्या यात्रांची खिल्ली 
 गेवराईः सभेची गर्दीच आमदार लक्ष्मण पवारांच्या कामाची पावती 
अंबड (जि. जालना) ः मराठवाड्याला पुढील काळात दुष्काळ पाहू देणार नाही 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: alliance will be declared very soon