लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी ललिताला परवानगी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

बीड - लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी अर्ज केल्याने चर्चेत आलेल्या बीड जिल्हा पोलिस दलातील महिला शिपाई ललिता साळवे यांना अखेर पोलिस महासंचालक सतीश माथुर यांनी शस्त्रक्रियेस परवागी दिली आहे. राज्य पोलिस दलातील अशा प्रकारचे हे पहिलेच प्रकरण आहे. 

शरीरात होत असलेल्या पुरुषी बदलांमुळे लिंगबदल शस्त्रक्रियेस परवानगी द्यावी, असा अर्ज ललिता साळवे यांनी २०१७ मध्ये केला होता. महासंचालकांनी परवानगी नाकारल्याने साळवे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यात लक्ष घालून महासंचालकांनी सहानुभूतिपूर्वक विचार करण्याची सूचना केली होती.

Web Title: Allow for Penis Change surgery lalita salave