लातूर जिल्ह्यात पाचव्या दिवशीही पाऊस

हरी तुगावकर
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

लातूर जिल्ह्यात सलग पाच दिवसापासून रिमझिम पाऊस पडत
आहे. मंगळवारी रात्रीही जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळात पावसाने हजेरी लावली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी 450.73 मिलीमीटर पाऊस झाला आहे. या भीज पावसामुळे खरीप पिक आता जोमात आले आहे.

लातूर- लातूर जिल्ह्यात सलग पाच दिवसापासून रिमझिम पाऊस पडत
आहे. मंगळवारी रात्रीही जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळात पावसाने हजेरी लावली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी 450.73 मिलीमीटर पाऊस झाला आहे. या भीज पावसामुळे खरीप पिक आता जोमात आले आहे.

लातूर जिल्ह्यात मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात महसूल मंडळनिहाय झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये-
पुढील प्रमाणे आहे. लातूर 27, कासारखेडा 24, गातेगाव 21, तांदुळजा 27,
मुरूड 11, बाभळगाव 25, हरंगुळ बु. 34, चिंचोलि ब. 26, औसा 21, लामजना 21,
किल्लारी 24, मातोळा 36, भादा 18, किनिथोट 9, बेलकुंड 17, रेणापूर 33,
पोहरेगाव 30, कारेपूर 34, पानगाव 28, उदगीर 28, मोघा 25, हेर 19, देवर्जन
31, वाढवणा बु. 28, नळगीर 25, नागलगाव 15, अहमदपूर 47, किनगाव 43, खंडाळी
60, शिरूर ताजबंद 41, हाडोळती 38, अंधोरी 48, चाकूर 29, वडवळ नागनाथ 32,
नळेगाव 33, झरी बु. 35, शेळगाव 25, जळकोट 50, घोन्सी 29, निलंगा 15,
अंबुलगा बु. 18, कासारशिरसी 25, मदनसुरी 24, औराद शहाजनी 19,
कासारबालकुंदा 25, निटूर 26, पानचिंचोली 22, देवणी बु. 15, वलांडी 27,
बोरोळ 17, शिरुर अनंतपाळ 28, हिसामाबाद 24, साकोळ महसूल मंडळात 25
मिलीमीटर पाऊस पडला आहे.

लातूर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 450.73 मिलीमीटर पाऊस झाला आहे. यात
लातूर तालुक्यात 372.99, औसा 364.70, रेणापूर 433, अहमदपूर 464.68, चाकूर 570.80, उदगीर 409.02, जळकोट 408.50, निलंगा 465.22, देवणी 470.01,  शिरुर अनंतपाळ तालुक्यात 548.33 मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यात गेल्या चार पाच दिवसापासून भीज पाऊस सुरु आहे. यामुळे खऱीप पिकांना मोठे जीवदान मिळाले आहे.

Web Title: also rain on the fifth day in Latur district