esakal | हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचा आलेख वाढत असला तरी दहा हजार रुग्णांनी केली मात

बोलून बातमी शोधा

कोवीड

हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचा आलेख वाढत असला तरी दहा हजार रुग्णांनी केली मात

sakal_logo
By
राजेश दार्वेकर

हिंगोली : जिल्ह्यात करोनाचा आलेख वाढत असला तरी त्यावर मात करणारे देखील कमी नाहीत आतापर्यंत ११ हजार ८९७ जण कोरोना बाधित झाले तर १० हजार २९० रुग्णांनी त्यावर मात केली आहे.

जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट रुग्णांची संख्या चांगलीच वाढवत आहे. दररोज सरासरी दिडशे ते दोनशे रुग्ण कोरोना बाधित आहेत. मात्र त्यावर मात करणारे देखील शंभराच्यावर आहेत. यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग अहोरात्र झटत आहे. जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय, २४ आरोग्य केंद्र तीन खाजगी आरोग्य केंद्रात लसीकरण केले जात आहे. आतापर्यंत ५४ हजार जणांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेतले आहे. यासह आरटीपीसीआर, अँन्टीजेन चाचण्या देखील मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. जिल्ह्यात गर्दी होणाऱ्या सर्व दुकाने, आस्थापना बंद आहेत. शासकीय कार्यालयात देखील पंधरा टक्के कर्मचारी उपस्थित राहत आहेत.

हेही वाचा - विधायक बातमी : वसमत येथील श्रामनेर प्रशिक्षण केंद्रास मार्बल, ठिबक संच धम्मदान

यामुळे कोरोनाची साखळी कमी करण्यासाठी उपाय योजना केल्या जात आहेत. मात्र कोरोनाचा आलेख वाढतच आहे. त्यावर मात करणारे देखील कमी नाहीत. जिल्ह्यात आजपर्यंत ११ हजार ८९७ जण कोरोना बाधित झाले तर १० हजार २९० रुग्णांनी त्यावर मात केली आहे. एक हजार ४०४ जणांवर उपचार सुरु आहेत. तर आजपर्यंत २०९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात भरती असलेल्या ४४० रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना आॅक्सीजन चालू आहे. ४१ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. सोमवारी ४८१ जणांची प्रकृती चिंताजनक जनक असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी सांगितले.

संपादन- प्रल्हाद कांबळे