ऍल्युमिनियमची लालपरी होणार इतिहासजमा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - काळाची पावले ओळखत एसटीने नवीन बदल स्वीकारला आहे. महामंडळाच्या स्थापनेपासून असलेली ऍल्युमिनियम बांधणीची बस (लालपरी) आता इतिहासजमा होणार आहे. नवीन शिवशाही बसपाठोपाठ आता महामंडळाच्या ताफ्यात एमएस स्टीलच्या बस बांधणीला सुरवात झाली आहे. पहिल्याच महिन्यात औरंगाबादच्या कार्यशाळेत 14 बसची बांधणी करून विविध आगारांना पाठविण्यात आल्या आहेत, तर राज्यात 100च्या जवळपास बस रस्त्यावर आल्या आहेत. 

महामंडळात बसची बांधणी ऍल्युमिनियमच्या पत्र्यामध्ये केली जात होती. ऍल्युमिनियम पत्र्यामुळे अपघातात मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. म्हणूनच आता एमएस स्टील बॉडीच्या बांधणीला सुरवात करण्यात आली आहे. एमएस स्टील बॉडीमुळे प्रवाशांच्या जीविताचा धोका कमी झाला आहे. 

एमएस स्टीलची बांधणी 
राज्यातील औरंगाबाद, नागपूर व पुणे कार्यशाळेत नवीन बस बांधणीला सुरवात झाली आहे. औरंगाबादेत दोन जुलै रोजी शेवटची ऍल्युमिनियम बस बांधणी झाली. येथील कार्यशाळेत दीड दिवसात एका बसची बांधणी केली जाते. महिन्याला साधारण 30 ते 35 बसगाड्यांची बांधणी केली जात आहे. 

काय आहेत वैशिष्ट्ये? 
उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून एसीपी शीटचा वापर 
स्लायडिंगच्या खिडक्‍यांचा वापर 
बसचा समोरील आकार ऐरोडायमेन्शन पद्धतीचा 
चालकासमोरील काचेसाठी विण्डशिल्ड ग्लासचा वापर 
लालऐवजी रंगसंगतीत पॉलियुरिथीन पेंटचा वापर 
उंची वाढविल्याने आरामदायी आसनव्यवस्था 

नवीन बस बांधणीत अपघाताच्या वेळी प्राणहानी होणार नाही याचा विचार करण्यात आलेला आहे. यापुढे राज्यात ऍल्युमिनियम बस तयार होणार नाहीत. 
- उद्धव काटे, व्यवस्थापक, मध्यवर्ती कार्यशाळा, औरंगाबाद 

Web Title: aluminum-building stbus (Lalpari) is now going to be history