टॉवरवर चढून सरकारविरोधात घोषणाबाजी, अंबडमध्ये छावा संघटना आक्रमक !  

बाबासाहेब गोंटे
Friday, 25 September 2020

अंबड नगरपालिका लगत असलेल्या बीएसएनएल टॉवरवर चढुन छावा मराठा युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हातात भगवे ध्वज घेऊन विविध मागण्यासाठी तीव्र आंदोलन केले.

अंबड (जि.जालना) :  अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने अंबड येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनोखे आंदोलन करण्यात आले आहे. संघटनेच्या पदाधिकार्यांनी बीएसएनएल टॉवर्सवर चढून आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

अंबड नगरपालिका लगत असलेल्या बीएसएनएल टॉवरवर चढुन छावा मराठा युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हातात भगवे ध्वज घेऊन विविध मागण्यासाठी तीव्र आंदोलन केले. नौकर भरतीला स्थगिती मिळालीच पाहीजे. मराठा आरक्षणाला देण्यात आलेली स्थगिती तात्काळ हटविण्यात आली. आदी मागण्यासाठी शुक्रवारी (ता.२५) दुपारी साडे बारा वाजेच्या दरम्यान आंदोलन करण्यात आले.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

याप्रसंगी बोलताना अखिल भारतीय छावा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष संतोष जेधे म्हणाले की, जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा होत नाही. शासनाने तात्काळ नोकरी भरतीवर स्थगिती करावी. अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने संपुर्ण मराठवाडयात आपल्या न्याय हक्कांच्या मागण्यासाठी आंदोलन केले जात आहे. मागण्या जो पर्यंत मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार आहे, असे ही ते म्हणाले. छावा कधीच आंदोलन शांततेत करीत नाही. त्यामुळे सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा याचे पडसाद राज्यभर पडत नाही.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यानंतर अंबडचे नायब तहसिलदार बाबुराव चंडोल यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी छावाचे जिल्हाध्यक्ष देवकर्ण वाघ, जिल्हा कार्याध्यक्ष राधाकिसन शिंदे, युवा जिल्हाध्यक्ष संदीप ताडगे, जिल्हा उपाध्यक्ष शिवनाथ काळवणे, तालुकाध्यक्ष राधेशाम पवळ, कार्याध्यक्ष तुळशीराम टाकसार, उमेश गव्हाणे, बंटी गायकवाड, आकाश थेटे, कैलास पाटील, योगेश देशमुख, बाळासाहेब इंगळे, शिवाजी पाटील आदींची उपस्थिती होती.  

(Edit- Pratap Awachar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ambad city Chhava Sangatna Movement for maratha reservation