पतीशी फोनवर बोलतच तिने घेतली विहिरीत उडी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

अंबड - मोबाईल फोनवर बोलत संतापाच्या भरात तिने ‘आता विहिरीतच उडी घेते’, असे म्हटले.  अंधारात हे वाक्‍य एकाने ऐकल्यानंतर त्याला लगेच विहिरीत उडी घेण्याचा आवाज झाला. आरडाओरडा झाल्यानंतर अनेकांनी विहिरीजवळ धाव घेतली. मात्र अंधार असल्याने विहिरीत कुणी उतरले नाही. तासाभरानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. ही घटना अंबड शहरातील ठाकूरनगर परिसरातील विठ्ठल-रुखमाई मंदिरालगत घडली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी मारोती लोखंडे (वय २४, रा. राहुरी) ही पतीसोबत वाद झाल्यामुळे पाचोड मार्गावरील बाळानगर येथे गेल्या सहा महिन्यांपासून माहेरी राहत होती. दरम्यान, बुधवारी सायंकाळी सात वाजता ती अंबड शहरातील ठाकिूरनगर परिसरातील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरालगत आली. तेव्हा मोबाईल फोनवर बोलताना संतापाच्या भरात तिने ‘आता विहिरीतच उडी घेते’ असे म्हटले. परिसरात अंधार असल्याने हे वाक्‍य कोणीतरी ऐकले. त्यानंतर त्याला विहिरीत उडी घेतल्याचा आवाज आला. त्याने आरडाओरडा केल्यानंतर अनेक जण विहिरीजवळ पोचले. परिसरात एकच गर्दी झाली. मात्र कोणीही विहिरीत उतरले नाही. 

तासभर विहिरीभोवती बघ्यांची केवळ गर्दी जमली होती. कोणीतरी ही बाब अंबड पोलिस ठाण्यात कळविली. ठाण्याचे पोलिस हवालदार संतोष हावळे, गायके यांच्यासह गृहरक्षक दलाचे जवान घटनास्थळी हजर झाले. अग्निशमन दलाचे कर्मचारी आले. त्यानंतर शोधकार्य करत लक्ष्मी हिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. लक्ष्मी हिला दोन मुले असून, पतीने दुसरा घरोबा केल्याचे कळाल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा होती.  याप्रकरणी उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात घटनेची नोंद घेणे सुरू होते.

Web Title: ambad news women suicide in well