शासनाकडून मराठवाड्याबाबत दुजाभाव - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

अंबाजोगाई - "मराठवाड्याच्या विकासाबाबत मागील साडेतीन वर्षांत शासन उदासीन आहे. उलट मराठवाड्याच्या हक्काच्या संस्था विदर्भात नेल्या. शासन मराठवाड्याबाबत दुजाभाव करत आहे,' असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल यात्रेदरम्यान गुरुवारी (ता. 18) गेवराई, माजलगाव, अंबाजोगाई येथे सभा झाल्या. पवार म्हणाले, "आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही; परंतु "जर कोणी अरे म्हणाले तर कारे म्हणत उत्तर देऊ. सरकार मस्तीत असून, मस्ती उतरविण्यासाठी आगामी निवडणुकीत योग्य बटन दाबा. देशाची वाटचाल अराजकतेकडे होत आहे. आणीबाणीसदृश स्थिती झाल्याची भीती जनतेत निर्माण झाली आहे.

त्यामुळे राज्य व केंद्र सरकारने आपल्या कारभाराचे आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन करावे.' राज्यातील राजकीय हवा बदलत आहे. लोक उत्स्फूर्तपणे बाहेर पडत आहेत. तरुण मोदींना कंटाळले आहेत, असेही ते म्हणाले.

Web Title: ambajogai marathwada news ajit pawar talking