अंबाजोगाईत आढळल्या रेखीव मूर्ती, अखंड दगडी खांब 

प्रशांत बर्दापूरकर
बुधवार, 25 जानेवारी 2017

सकलेश्‍वर मंदिराजवळ स्वच्छतेसाठी सुरू होते खोदकाम 

अंबाजोगाई : शहराच्या उत्तरेस डोंगराळ भागात असलेल्या हेमाडपंती सकलेश्‍वर मंदिरालगत स्वच्छतेसाठी केलेल्या खोदकामात दगडात कोरलेल्या रेखीव मूर्ती सापडल्या आहेत. या मूर्तींसह मंदिराचे अखंड दगडी खांब व हत्तीच्या मूर्तीही आढळून आल्या आहेत. हे मंदिर या परिसरात बाराखांबी मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. 

सकलेश्‍वर मंदिराजवळ स्वच्छतेसाठी सुरू होते खोदकाम 

अंबाजोगाई : शहराच्या उत्तरेस डोंगराळ भागात असलेल्या हेमाडपंती सकलेश्‍वर मंदिरालगत स्वच्छतेसाठी केलेल्या खोदकामात दगडात कोरलेल्या रेखीव मूर्ती सापडल्या आहेत. या मूर्तींसह मंदिराचे अखंड दगडी खांब व हत्तीच्या मूर्तीही आढळून आल्या आहेत. हे मंदिर या परिसरात बाराखांबी मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. 

बाराखांबी मंदिरालगतच लिंगायत स्मशानभूमी आहे. त्यामुळे 2016 च्या उन्हाळ्यात वीरशैव समाजातील नागरिकांनी एकत्र येऊन या परिसरात स्वच्छता अभियान राबविले. दरम्यान, जवळचा बाराखांबी मंदिर परिसरही स्वच्छ करावा असा संकल्प नागरिकांनी केला. त्यानुसार या मंदिराच्या परिसरातील वेड्या बाभळीची झाडे, झुडपे जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आली. यावेळी रेखीव मूर्तीही निघाल्या. 

काही मूर्ती झिजलेल्या 
खोदकामात आढळलेल्या मूर्ती या अखंड दगडात घडविलेल्या असून त्या अत्यंत सुबक व आकर्षक आहेत. काही मूर्ती झिजलेल्या आहेत. या सर्व मूर्ती देवादिकांच्या असून त्यामधून तत्कालीन सामाजिक जीवनाची अनुभूती येते. येथील ज्येष्ठ पत्रकार हनुमंत पोखरकर यांच्यासह वीरशैव समाजातील नागरिकांनी या स्वच्छता अभियानासाठी पुढाकार घेतला. 

संशोधन होण्याची गरज 
पुरातत्त्व विभागाने या परिसरातील मंदिराच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. मोठ्या ऐतिहासिक वास्तू असतानाही पुरातत्त्व विभागाकडून अद्याप कुठलेच संशोधन झालेले नाही. त्यामुळे विविध मंदिराबाबत संशोधन होऊन या वास्तूंच्या सुरक्षिततेबाबत उपाय केले पाहिजेत अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्‍त होत आहे. 

शहराला ऐतिहासिक वारसा 
अंबाजोगाई शहराला ऐतिहासिक वारसाही आहे. मुकुंदराज मंदिर परिसरात असे विविध महादेवाची मंदिरे आहेत. शहरातील हेमाडपंती खोलेश्‍वर मंदिर, चौबाऱ्यातील गणेश मंदिर, अमृतेश्‍वर, काशिविश्‍वेवर, पापनाश मंदिर अशा विविध पौराणिक मंदिरांचा त्यात समावेश आहे. 
 
सकलेश्‍वर हे यादवकालीन मंदिर : प्रा. शरद हेबाळकर 
येथील सकलेश्‍वर (बाराखांबी) मंदिर हे यादवकालीन आहे. इ. स. पूर्व तेराव्या व चौदाव्या शतकात हे मंदिर यादवांच्या काळात बांधलेले आहे. मंदिरालगत सापडलेल्या मूर्ती याच मंदिराच्या असतील. पुरातत्त्व विभागाने ही मंदिरे ताब्यात घेऊन त्यांची सुरक्षितता केली पाहिजे. या परिसरात उत्खनन झाले तर आणखी मंदिरे व मंदिरांचे अवशेष मिळू शकतात, अशी माहिती इतिहाससंशोधक प्रा. डॉ. शरद हेबाळकर यांनी दिली. 
 

 
 

Web Title: Ambajogai Statue monolithic polls